शिक्षण क्षेत्रामधील प्रसारित भ्रामक जाहिरातीवर आळा घालण्याची मागणी:तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालकांना ग्राहक पंचायतचे निवेदन
प्रतिनिधी | तिवसा शिक्षण क्षेत्रात वाढत्या भ्रामक जाहिरातीमुळे विद्यार्थी व पालकांची अक्षरशः दिशाभूल करून आर्थिक लूट होत असल्याने प्रकारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने २४ एप्रिल रोजी तिवसा तहसीलदार यांच्यामार्फत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. शासनाने २५ डिसेंबर २०२५ रोजी काढलेल्या परिपत्रकांच्या अनुषंगाने भ्रामक जाहिराती व दिशाभूल करणाऱ्या…