मलकापुरात गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळून खाक:85 वर्षीय वृद्धेचा आगीत होरपळून मृत्यू; अशोक नगर परिसरातील धक्कादायक घटना
बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका घराला लागलेल्या आगीत 85 वर्षीय वृद्धेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की, बघता बघता संपूर्ण घर जळून खाक झाले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मलकापूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ…