Headlines

बनावट नोटांचा वाद; पडेगावच्या एकाचे अपहरण; येवल्यात भक्त निवासात डांबले:15 लाखांच्या बदल्यात 30 लाखांच्या बनावट नोटांचे दाखवले आमिष

पडेगाव येथून एका व्यक्तीचे अपहरण करून त्याला येवला येथे डांबून ठेवल्याच्या प्रकरणात बनावट नोटांच्या रॅकेटचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणी २ आरोपींना अटक करत पीडिताची सुटका केली. या घटनेमुळे शहरात बनावट नोटांचे व्यवहार करणारे संघटित जाळे सक्रिय असल्याचे उघड झाले असून, यातील मुख्य मध्यस्थ फरार झाला आहे. पोलिस निरीक्षक गजानन…

Read More

‘जीएमसी’त आता खऱ्या अर्थाने‎‘स्मार्ट’स्वच्छता; दोन वेळा सफाई‎:कंपनीच्या विरोधात तक्रारी तीन शिफ्टमध्ये होतेय रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता‎

प्रतिनिधी | अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयातील स्वच्छतेसाठी नियुक्त स्मार्ट कंपनीमार्फत दिवसांतून तीन शिफ्टमध्ये स्वच्छतेचे काम केले जात असल्याने रुग्णालयाची स्वच्छता केली जात आहे. संपूर्ण रुग्णालयाची मशीनद्वारे स्वच्छता कंत्राटी कर्मचारी आता करत असल्याने रुग्णालयाचे आवार वॉर्डाच्या समोरील पॅसेज, सर्विस गल्लीत साचलेले कचऱ्याचे ढीगही उचलण्यात आले आहेत. रुग्णालयात वॉर्डामध्ये प्रवेश करताच येणारी दुर्गंधी आता दूर झाली आहे….

Read More

जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा‎

नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषधी दुकान . यामुळे या काही मेडिकल्समधून विक्री होणारी औषधे, त्यांची गुणवत्ता आणि दराबाबत रुग्णांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. तसेच…

Read More

Anita Advani on Rajesh Khanna Relation

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉम्बे हायकोर्टाने राजेश खन्ना यांच्यासोबतच्या अनिता आडवाणी यांच्या नात्याला विवाह मानण्यास नकार दिल्यानंतर, आता अनिता यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका अलीकडील मुलाखतीत त्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाला ‘न्यायाची घोर थट्टा’ असे म्हटले आहे. अनिता यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या कायदेशीर लढाईतून मागे हटणार नाहीत आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी संघर्ष…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:कपाशी बियाणे पहिल्याच दिवशी संपले; नाइलाजास्तव अन्य खरेदी

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात बियाणे विक्रीचा शुभारंभानंतर पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी असलेले कपाशी बियाणे अजित-५ हे वाण संपल्याचे शनिवारी दिसून आले. शेतकऱ्यांनी सकाळीच अनेक कृषी केंद्रांवर धाव घेतली. मात्र त्यांना या बियाण्यांचा साठा संपल्याचे सांगण्यात आले. कृषी केंद्रांचे संचालक, तेथील कर्मचारी शेतकऱ्यांना अन्य बियाणे घेण्याचे सुचवत असल्याचे पहावयास मिळाले. मात्र शेतकरी त्याच वाणावर ठाम होते….

Read More

अमित शहा, फडणवीस अन् शिंदे एकदिलाने काम करतात:महायुतीत राष्ट्र प्रथम; उबाठामध्ये मात्र गटबाजीच गटबाजी, ठाकरेंचा दौरा म्हणजे वरातीनंतर घोडे- भाजप

महायुतीमध्ये अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे राष्ट्र प्रथम या भूमिकेतून एकदिलाने काम करत आहेत. महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी नाही. उलट उबाठा गटामध्ये विविध नेत्यांमध्ये मतभेद आणि संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे. महायुतीचा अजेंडा महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास आहे, तर विरोधकांचा अजेंडा केवळ सत्तेचे राजकारण आहे, असे भाजनप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

चिमुकल्याचा सेफ्टी टँकमध्ये पडून मृत्यू:लपंडाव खेळताना न्यु शिक्षण कॉलनीत घडली घटना, पोलिसांत नोंद‎

लहानग्याचे हसणे-खेळणे आणि मित्रांसोबतचा तो निरागस खेळ. कोणाला ठाऊक होते की हा खेळ कार्तिकच्या आयुष्याचा शेवटचा खेळ ठरेल? शहरातील अकोली मार्गावरील न्यू शिक्षक कॉलनीमध्ये रविवारी (दि. २६) रात्री काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना घडली. मित्रांसोबत लपंडाव खेळताना आठ वर्षांचा चिमुकला कार्तिक अमोल ठाकरे याचा एका उघड्या सेफ्टी टँकमध्ये पडून करुण अंत झाला. कार्तिक रविवारी सायंकाळी…

Read More

विकास लवांडे यांना अखेर जामीन मंजूर:आरोपींना सोडून निर्दोषांना गुन्ह्यात अडकवले की तोंडावर आपटावेच लागते हे सिद्ध – रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना आज मंगळवारी अखेर जामीन मंजूर झाला. वारकरी संप्रदायातील काही कीर्तनकारांविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी त्यांना गत आठवड्यात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते तुरुंगात होते. पण आज कोर्टाने त्यांची जामिनावर सुटका केली. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या सुटकेचे स्वागत करत पोलिसांवर टीका केली आहे. आरोपींना सोडून निर्दोष…

Read More

गोंदियात कठडा नसलेल्या विहिरीत पडून वाघाचा मृत्यू:शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात आल्याची शक्यता, तपास सुरू

गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्रातील माल्ही बीट अंतर्गत कोडेलोहारा परिसरात एका शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार सकाळी १० वाजता उघडकीस आली. मृत वाघ सुमारे ४ ते ५ वर्षांचा होता. ग्रामस्थांना विहिरीत वाघाचा मृतदेह तरंगताना दिसताच त्यांनी तात्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा वाघ शिकारीच्या किंवा पाण्याच्या शोधात फिरत…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आतापर्यंत 9 जणांची सुटका, एकाचा मृत्यू; 2 दिवसांनंतरही कचऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा शोध सुरूच

पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोत झालेल्या भीषण दुर्घटनेला आता दोन दिवस उलटून गेले असून, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अद्यापही युद्धपातळीवर मोहीम सुरू आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि अग्निशमन दलाच्या पथकाने आतापर्यंत ९ कर्मचाऱ्यांना कचऱ्याच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले आहे. मात्र, या दुर्घटनेत एका कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, अजूनही ८ कर्मचारी कचऱ्याच्या…

Read More