मोटेगावकर, प्रा.कुलकर्णीने ‘नीट’चा पेपर पालकांना विकला 10 ते 12 लाखांंत:पालकांनी पुढे नातेवाईक, मित्रांना विक्री केला 2 ते 10 लाखांत
‘नीट’चा केमिस्ट्रीचा पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी व ‘आरसीसी’चा संचालक प्रा शिवराज मोटेगावकर यांनी ‘नीट’ परीक्षेचा पेपर १० ते १२ लाख रुपयांपर्यंत नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विक्री केला आहे. पेपर विकत घेण्यासाठी अनेक पालकांनी या दोघांना ऑनलाइन रक्कम पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रा.कुलकर्णी व प्रा. मोटेगावकर यांनी ज्यांना पेपर विकले त्या पालकांनी पुढे…