नेरपिंगळाईत नैसर्गिक शेती अभियानांतर्गत तूर पीक शेतीशाळा:शेतकऱ्यांना शाश्वत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढीचे सखोल मार्गदर्शन
नेरपिंगळाई येथे महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियान व खेती बचाव अभियान अंतर्गत तूर पीक व्यवस्थापन विषयावर शेतीशाळेचे पहिले सत्र मंगळवारी यशस्वीरित्या आयोजित करण्यात आले. या उपक्रमात शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती पद्धती आणि तूर पिकाच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या शेतीशाळेमध्ये नैसर्गिक शेतीचे महत्त्व, माती परीक्षणाची आवश्यकता, बीज प्रक्रिया, तूर पिकाचे नैसर्गिक व सुधारित व्यवस्थापन, एकात्मिक…