विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरला अधिक मासानिमित्त भाविकांची अलोट गर्दी:वर्धा नदीवर पवित्र स्नान करून घेतले जातेय विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन
विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या तसेच आई रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापूर येथे सुरू असलेल्या अधिकमास व पुरुषोत्तम मास पर्वानिमित्त हजारो भाविक वर्धा नदीवर पवित्र स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाचा . १७ मे पासून सुरू झालेल्या या धार्मिक पर्वात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, श्रीमद्भागवत कथा, पारायण, हरिपाठ, कीर्तन तसेच…