बालीमध्ये नुसरत भरुचाचा अपघात झाला:दुखापत झाल्यानंतर रुग्णालयात दाखल, कामानिमित्त गेली होती अभिनेत्री
अभिनेत्री नुसरत भरुचाचा बालीमध्ये अपघात झाला. या दुर्घटनेत तिला दुखापत झाली असून त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. एनडीटीव्हीने आपल्या वृत्तात असा दावा केला आहे. मात्र, तिची दुखापत किती गंभीर आहे, याची माहिती समोर आलेली नाही. एनडीटीव्हीच्या वृत्तात सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले आहे की, नुसरत भरुचा बालीमध्ये एका कामानिमित्त गेली होती. त्याचदरम्यान तिचा अपघात झाला….