Headlines

ठाण्याचे बीड झालंय, या लेडी डॉनला कोण वाचवतंय?:माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिप ट्वीट करत संजय राऊतांचा गंभीर आरोप

ठाण्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्याकांडाने राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक अत्यंत आक्रमक झाले असतानाच, आता खासदार संजय राऊत यांनी शिवसेना (शिंदे गट) नेत्या तथा ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची एक जुनी,…

Read More

व्यापाऱ्यांसाठी कल्याण आयोग आणि सामाजिक सुरक्षा योजना लागू करा:अखिल भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंचचे नितिन अग्रवाल यांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी

व्यापारी आणि उद्योग क्षेत्र हे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, करांच्या माध्यमातून शासनाच्या महसुलात मोठे योगदान देण्याबरोबरच लाखो नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात. त्यामुळे व्यापाऱ्यांची सुरक्षा, सन्मान आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष धोरणे आखून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी अखिल भारतीय उद्योग व्यापार सुरक्षा मंचचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नितिन अग्रवाल यांनी पत्रकार…

Read More

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचे जनतेला भावनिक आवाहन:नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन, म्हणाले, शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच जगदंबेची खरी सेवा!

राज्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळाचे संकट अधिक गंभीर झाले आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून, आता रब्बी हंगामावरही संकट निर्माण झाले आहे. अनेक भागांत पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून, ग्रामीण भागातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला भावनिक आवाहन…

Read More

लष्करी नर्सिंग सेवेच्या शताब्दी वर्षाचा पुण्यात समारोप:दक्षिण कमांड मुख्यालयातील युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करत वाहिली आदरांजली

लष्करी नर्सिंग सेवा (एमएनएस) स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त पुणे गॅरिसनमधील एमएनएस अधिकाऱ्यांनी शतकपूर्ती सोहळा उत्साहात साजरा केला. ‘स्मितहास्यासह सेवा’ हे ब्रीद घेऊन एमएनएसच्या अधिकाऱ्यांनी सशस्त्र दलातील जवान तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्यसेवा देताना समर्पण, व्यावसायिकता आणि सेवाभावाची परंपरा कायम राखली आहे. शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त दक्षिण कमांडच्या एमएनएस मुख्यालयाच्या ब्रिगेडियर श्रीलेथा पी. एस. तसेच कार्यरत आणि माजी एमएनएस अधिकाऱ्यांनी…

Read More

नांदी साहित्य संमेलनात 'राजकीय साहित्यावर' संवाद:राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटणे आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांचे प्रतिपादन

सामाजिक जीवन ज्यावेळी व्यक्त होते, तेथून साहित्याची निर्मिती होत असते. त्यामुळे राजकारण आणि साहित्य यांचा परस्परांशी जवळचा संबंध असून, आचार्य अत्रे यांच्या प्रमाणे राजकारणाचे प्रतिबिंब साहित्यात उमटले पाहिजे. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न, संघर्ष आणि अनुभव व्यक्त झाले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना नेत्या, महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती वआणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महाराष्ट्र…

Read More

सोनाली कुलकर्णींना पहिला विक्रम गोखले सन्मान, मुंबा चित्रपट महोत्सव पुण्यात:6 ऑक्टोबरपासून सुरू होणार, 152 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपट विनामूल्य दाखवले जाणार

मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सातवा मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दि. 6 ते 10 ऑक्टोबर 2026 या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला असून 41 देशांमधून आलेल्या 987 चित्रपटांमधून 152 चित्रपट प्रदर्शित केले जाणार आहेत, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक जय भोसले आणि महोत्सव संचालक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार परिषदेत दिली. महोत्सवाचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक अवचार, सहसचिव रोहित…

Read More

राहुल यांच्या फोननंतर पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा:पायलटच्या अहवालावर निर्णय; सिंगला आघाडीवर, मात्र शीखबहुल राज्यात हिंदू प्रदेशाध्यक्षाचा पेच

पंजाबमध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंह राजा वडिंग यांनी राजीनामा दिला आहे. पक्षाचे पंजाब प्रभारी सचिन पायलट यांच्या अहवालानंतर राहुल गांधी यांनी वडिंग यांना फोन करून नवीन प्रदेशाध्यक्ष नियुक्त करत असल्याचे सांगितले. वडिंग यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर स्वतःच्या नावापुढे ‘माजी प्रदेशाध्यक्ष’ असे लिहून याला दुजोरा दिला आहे. वडिंग यांच्या राजीनाम्यानंतर संगरूरचे माजी खासदार विजयइंदर…

Read More

2 तोळे सोन्यासाठी गरोदर सुनेचा छळ:सिझेरियनचा खर्च नाकारल्याने स्वातीचा बाळासह मृत्यू, पतीसह 4 जणांवर गुन्हा

माहेरहून 2 तोळे सोने आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा आणि गंभीर प्रकृती असतानाही वैद्यकीय उपचारांसाठी मदत न केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात समोर आला आहे. नऊ महिन्यांची गर्भवती असलेल्या 26 वर्षीय महिलेची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी शस्त्रक्रियेचा खर्च करण्यास नकार दिल्याचा आरोप आहे. त्यामुळे…

Read More

Rahul Gandhi Balaghat LIVE Photos Update; Baiga Adivasi Child Deaths Tragedy

Marathi News National Rahul Gandhi Balaghat LIVE Photos Update; Baiga Adivasi Child Deaths Tragedy | BJP Congress आशीष उरमलिया/सुनील कोरे. बालाघाट4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांनी गुरुवारी बालाघाटमधील बिरसा ब्लॉकच्या जगला गावात बैगा आदिवासींची भेट घेतली. ते येथे एक तास थांबले. यावेळी त्यांनी आजारामुळे मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली. राहुल यांना भेटण्यासाठी आसपासच्या…

Read More

Abhijeet Dipke Warns Nationwide Protest Against Dnyanesh Kumar

“केंद्रीय निवडणूक आयोग ही लोकशाहीची स्वायत्त संस्था न राहता नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या हातातील बाहुले बनली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे ‘देशाचे गद्दार’ असून त्यांनी पदावर राहण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. त्यांचा तत्काळ राजीनामा . देशव्यापी आंदोलनाची दिशा- शिवाजी पार्क ते जंतरमंतर पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे, राष्ट्रीय प्रवक्त्या…

Read More