रोहित पवारांची केंद्र-राज्य सरकारवर टीका:मतदारयादीतील घोळावरून निवडणूक आयोगावर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर विविध मुद्द्यांवरून टीका केली. देशातील वाढती महागाई, तेलाचे दर, परराष्ट्र धोरण, मतदारयादीतील कथित घोळ तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित केले. कर्मवीर जयंतीनिमित्त कोपरगाव येथे आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. रोहित पवार यांनी देशातील महागाईच्या…