ताणतणाव घालवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मेडिटेशन करावे:बबनराव धावणे यांचे आवाहन, इयत्ता 5 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांनी केला आसनांचा सराव
भारताने योग अभ्यासाच्या रूपाने जगाला एक अनमोल देणगी दिली आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव सहन करण्याची शक्ती कमी झाल्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. अशा वेळी मनाला शांत करण्यासाठी योगासने करणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्यासाठी नियमित मेडिटेशन (ध्यान) करावे, असे आवाहन माजी क्रीडाशिक्षक बबनराव धावणे यांनी केले….