Headlines

कोल्हापूरच्या बाळूमामा मंदिरात कोट्यवधींचा आर्थिक घोटाळा:तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; आरोपी फरार

देशभरात राम मंदिरातील कथित गैरप्रकारांची चर्चा सुरू असतानाच, आता महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर येथील संत बाळूमामा मंदिरात कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. या घटनेमुळे धार्मिक संस्था आणि देवस्थानांमधील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा नव्याने ऐरणीवर आला असून, भक्तांच्या श्रद्धेशी खेळ खेळला गेल्याने सर्वत्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. 60 कोटींहून…

Read More

'रितेशची नोकरी धोक्यात':होस्टिंगवर सलमानची मस्करी, सोहेलच्या माजी पत्नीवर म्हणाला- महान भावाने आरोप स्वतःवर घेतले

बॉलिवूड अभिनेता सलमान खानने नुकतेच पहिल्यांदाच रिॲलिटी शो होस्ट करणाऱ्या अभिनेता रितेश देशमुखची खिल्ली उडवली आहे. लहान भाऊ सोहेलला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या सलमानने त्याच्या (सोहेलच्या) माजी पत्नीवरही टोमणा मारला आहे. त्याचे म्हणणे आहे की सोहेलने घटस्फोटाचा आरोप स्वतःवर घेतला, पण त्याने (सलमानने) सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. सोहेल खान ॲमेझॉन प्राईमच्या रिॲलिटी शो ‘अलायन्स’चा भाग बनला…

Read More

न्यायव्यवस्थेवरील विश्वास उरलेला नाही:अरविंद सावंतांचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाले- भ्रष्टाचार आणि विध्वंस हेच सरकारचे मॉडेल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, न्यायव्यवस्था, धर्मस्वातंत्र्य कायदा, नाशिकमधील रस्त्यांची अवस्था आणि संसदेच्या कामकाजासह विविध विषयांवर जोरदार टीका केली. देशातील न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. नाशिकमधील खड्ड्यांमुळे झालेल्या मृत्यूंसाठी सरकारला जबाबदार धरत कुंभमेळ्याच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही…

Read More

मुलीच्या प्रेमविवाहामुळे संतप्त वडिलांनी हत्या केली:मृतदेहाजवळ बसून राहिला; ओरडण्याचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावले

आग्रामध्ये प्रेमविवाहामुळे संतापलेल्या एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो मुलीच्या मृतदेहाजवळ बसून राहिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवतीने सुमारे 4 महिन्यांपूर्वी कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध गावातीलच एका तरुणाशी कोर्ट मॅरेज केले होते. तो तरुण ITBP मध्ये जवान आहे. मुलीच्या प्रेमविवाहामुळे वडील नाराज होते. लग्नानंतरही मुलगी तिच्या माहेरीच राहत होती. ही घटना रविवारी रात्री उशिरा…

Read More

'AI वाईट नाही, पण विचारशून्य होऊ नका':तुकाराम मुंढेंचा तरुणांना सल्ला, म्हणाले- सोशल मीडियावर दिसते म्हणून प्रत्येक रील खरे नसते

‘एआय’ (AI) मुळात वाईट नसून, आपण त्याचा वापर कशा प्रकारे करतो यावरच यशाचे गमक ठरते, असे स्पष्ट करत अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांना सजग राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारांची मोठी भेसळ केली जात असून एक प्रकारे विचारांचे युद्धच सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही गोंगाटाचा भाग न…

Read More

हिंगोली शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर पकडला:12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, चालकाविरुद्ध गुन्हा

हिंगोली शहरातील नांदेड नाका भागात पोलिसांच्या पथकाने सोमवारी ता. 3 पहाटेच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर पकडले असून 12.12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी टिप्पर चालका विरुध्द हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी टिप्पर चालकास ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातून वाळू घाटावरून अवैधरित्या वाळू उपसा व…

Read More

कर्नाटकात मंत्रिमंडळाचा विस्तार आज:शिवकुमार सरकारमध्ये 20 मंत्री सामील होतील, 12 नवीन चेहऱ्यांना पहिल्यांदा संधी मिळेल

कर्नाटकात मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी होणार आहे. काँग्रेस हायकमांडने 20 मंत्र्यांच्या नावांना मंजुरी दिली आहे. यामध्ये 12 नवीन चेहरे पहिल्यांदाच मंत्री बनतील, तर 8 विद्यमान मंत्र्यांची नावेही यादीत आहेत. गायत्री शांतिगौडा या मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या एकमेव महिला मंत्री असतील. शपथविधी सोहळा सोमवारी संध्याकाळी 4:05 वाजता बेंगळुरू येथील लोक भवनात…

Read More

पवईत 'हेवी डिपॉझिट'च्या नावाने गंडा:एकाच घरासाठी 17 जणांसोबत भाडेकरार नामा; सव्वा कोटींची फसवणूक, घरमालकावर गुन्हा

मुंबईतील पवई परिसरातील तुंगा गावात घरभाड्याच्या नावाखाली चालणाऱ्या एका मोठ्या फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. एका भामट्या घरमालकाने स्वतःचे एकच घर तब्बल 17 जणांना भाड्याने देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ‘हेवी डिपॉझिट’च्या नावाखाली सुमारे सव्वा कोटी रुपयांची रक्कम उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या पीडित नागरिकांच्या तक्रारीवरून पवई पोलिस ठाण्यात आरोपी घरमालकाविरोधात गुन्हा…

Read More

खासगी वाहनांवर 'पोलिस' पाटी लावणे भोवणार!:राज्यभर कडक कारवाईचे आदेश, अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी कठोर पाऊल

राज्यातील खासगी दुचाकी किंवा चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असे लिहिणाऱ्यांवर किंवा तशी लाल पाटी लावून फिरणाऱ्यांवर लवकरच कडक कारवाई होणार आहे. वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाने यासंदर्भात गांभीर्याने दखल घेतली असून, राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलिस अधीक्षकांना तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनांवर अशी पाटी लावण्यावर थेट…

Read More

'पालकमंत्री करा'च्या मागणीवर छगन भुजबळांची सावध भूमिका:म्हणाले- 'फ्लेक्स काढायला सांगितले, नाशिकच्या खड्ड्यांकडे लक्ष द्या'

नाशिकच्या पालकमंत्रीपदावरून सुरू झालेल्या राजकीय चर्चेदरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसने ‘छगन भुजबळांना पालकमंत्री करा’ अशी मागणी करणारे होर्डिंग लावल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र, या मागणीपासून स्वतःला दूर ठेवत मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित फ्लेक्स तत्काळ काढण्यास सांगितल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी त्यांनी नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर असल्याचे मान्य करत प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची…

Read More