Headlines

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी:ब्रह्मपुरी 46.6 अंशांवर, छत्रपती संभाजीनगर @39.8

मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात 2, मध्य महाराष्ट्रात 3 तर विदर्भात 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी तापमान 1.4 अंश सेल्सियसने घसरले. सोमवारी तापमान 41.2 होते…

Read More

प्रगतिशील शेतकरी:संत्रा बागेत मोरिंगा, लक्ष्मीतरूची लागवड; अमरावतीच्या शेतकऱ्याला दरमहा 40 हजारांचे अतिरिक्त उत्पन्न

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण शेतकऱ्याने संत्राबाग कायम ठेवत त्यामध्ये मोरिंगा (शेवगा) आणि लक्ष्मीतरू यासारख्या आंतरपिकांची लागवड केली. या प्रयोगामुळे त्यांना दरमहा किमान 40 हजारांचा अतिरिक्त नफा मिळत आहे. अमरावती जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी अजिंक्य खेरडे (35) यांच्या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत शिक्षण…

Read More

बिल मंजुरीसाठी कमिशनखोरीचा भंडाफोड:6 टक्क्यांच्या ‘कट’चा खेळ उघड! बदलापूर नगर परिषदेत ACB ची कारवाई

बदलापूरमध्ये नगर परिषदेतील भ्रष्टाचाराचा मोठा प्रकार उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. कुळगाव-बदलापूर नगर परिषदेतील लेखाधिकारी विकास वैजीनाथ चव्हाण यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे. कामाच्या बिलांसाठी आणि सुरक्षा ठेवीच्या रकमेवर 6 टक्के कमिशनची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्थानिक प्रशासनात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाची…

Read More

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी…

Read More

जिल्हा बँकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार:अध्यक्षपदासाठी मंत्री अतुल सावे, विलास भुमरे, समीर सत्तार यांची नावे चर्चेत‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप महायुती करूनच निवडणूक लढण्याचे निश्चित झाले आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडे मुंबईत महायुतीच्या प्रमुखांची बैठक पार पडली. त्यामध्ये एकत्र निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे मनपा आणि जिल्हा परिषदेत स्वतंत्र निवडणुका लढवलेले हे तीनही पक्ष सहकाराची निवडणूक एकमेकांच्या साथीने लढणार आहेत. छत्रपती संभाजीनगरात २१…

Read More

नाशिक TCS धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा:हो, मीच दिले नमाजचे ट्रेनिंग; मुख्य आरोपी निदा खानची तपास यंत्रणांसमोर कबुली

नाशिक येथील नामांकित टीसीएस कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अटक केल्यानंतर, पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान तिने अत्यंत धक्कादायक कबुली दिली आहे. “होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर ट्रेनिंग दिले,” अशी कबुली तिने दिली आहे. या…

Read More