Headlines

सेन्सेक्स 400 अंकांनी वाढून 75,700च्या पातळीवर:निफ्टी 130 अंकांनी वाढून 23,790 वर पोहोचला; सरकारी बँका आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी

आज, म्हणजेच गुरुवार, 21 मे रोजी, सेन्सेक्स 400 अंकांनी (0.50%) वाढून 75,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 130 अंकांची (0.55%) वाढ झाली आहे, तो 23,790 वर पोहोचला आहे. आजच्या व्यवहारात सरकारी बँक आणि मेटल शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. दक्षिण कोरियाचा बाजार 7% पेक्षा जास्त वाढला काल अमेरिकन बाजार तेजीसह बंद झाले परदेशी गुंतवणूकदारांनी काल…

Read More

आमिर खानकडे लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का?:आमिरच्या तिसऱ्या लग्नावरून नीतेश राणेंचा घणाघात

आमिर खानचा तिसरा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. अशा काही गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा या लोकांकडे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पाहायचे का? ही चर्चा हळूहळू वाढत चालली आहे. हिंदू समाज बांधवांनी सावधान रहावे, असे ‘लव्ह जिहाद’चा ब्रँड ॲम्बेसेडर कुठेही दिसले तर यांचे चित्रपट पाहायचे का हे देखील ठरवायला हवे, असे मंत्री नीतेश राणे…

Read More

पैठणमध्ये स्वाभिमानीचे शोले स्टाईल आंदोलन:साखर कारखान्याच्या 19 कोटी 50 लाखांच्या एफआरपीसाठी टाकीवर चढून आंदोलन

संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याने 2025-26 च्या हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 19 कोटी 50 लाख रुपयांची एफआरपी (FRP) थकविल्याच्या निषेधार्थ आज पैठणमध्ये जोरदार आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालय परिसरातील पाण्याच्या टाकीवर चढून ‘शोले’ स्टाईलने आंदोलन सुरू केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

MP – झारखंडमध्ये वादळ – विजांमुळे 16 जण ठार:उत्तराखंडमध्ये घर -शाळांत ढिगारा शिरला; UP, राजस्थान, हरियाणात तापमान 42°C+

देशातील 6 राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णताही जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 42°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये शुक्रवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर आठ जण भाजले. देवासमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे घराच्या…

Read More

भाजपवर लाईन, काँग्रेससोबत लग्न!:यांना स्वतःचे खासदार सांभाळता येत नाहीत'; 6 खासदारांच्या बंडावर प्रकाश आंबेडकरांचा ठाकरेंना टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. “हे कोणतेही ऑपरेशन टायगर नाही, तर स्वतःचे खासदार सांभाळण्यात आलेले अपयश आहे,” असा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला. मुंबईत माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे गटाच्या राजकीय भूमिकेवर…

Read More

प्रगतीसाठी आदर्श निवडा; पीएसआय चटे यांचे मार्गदर्शन:संघर्ष योद्धा संस्थेच्या करिअर मार्गदर्शन सत्रात विद्यार्थ्यांशी संवाद

अमरावती येथील महाजनपुरा येथे ‘संघर्ष योद्धा बहुउद्देशीय संस्थे’ने ‘करिअर मार्गदर्शन सत्र २०२६’ चे आयोजन केले. या सत्रात राजापेठचे पोलिस उपनिरीक्षक रोशन चटे यांनी विद्यार्थ्यांना प्रगतीसाठी आयुष्यात एक आदर्श निवडण्याचे आवाहन केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या महापुरुषांची तत्त्वे आत्मसात केल्यास संकटांवर मात करून यश मिळवता येते, असे त्यांनी सांगितले. दहावी आणि बारावीच्या…

Read More

तेलंगणा- निवडणूक लढण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव:बिल मंजूर करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन; केंद्राची मंजुरी आवश्यक

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शनिवारी सांगितले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवण्यासाठी किमान वय २५ वर्षांवरून २१ वर्षांपर्यंत कमी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यानंतर, तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. हैदराबादमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणासंदर्भात आयोजित कॅन्डल लाइट रॅलीत त्यांनी हे विधान केले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विधानसभा आणि विधान परिषदेचे विशेष अधिवेशन बोलावले जाईल. प्रधान…

Read More

ममता बॅनर्जींचा हरल्या नाहीत, केंद्राने त्यांना दहशतीने रोखले:संजय राऊत यांचा आरोप; हिंदीला विरोध नाही, पण मराठी राज्याची प्रथम भाषा

आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे. हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचे आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला…

Read More

FDAची धडक कारवाई:115 वर्षे जुन्या 'पारशी डेअरी'चा परवाना रद्द; दुधात पावडर आणि तेलाची भेसळ, राज्यभरात 45 लाखांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न माफियांवर आणि भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू आहे. १४ आणि १५ जुलै २०२६ दरम्यान एफडीएने राज्यभरातील विविध दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नपदार्थांच्या केंद्रांवर छापे टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये मुंबईतील प्रतिष्ठित आणि 115 वर्षे जुन्या ‘पारशी डेअरी फार्म’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच, दुधाचे…

Read More

'शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है':संग्राम जगतापांचा इशारा, म्हणाले – 26 तारखेला त्यांनी बैल कापला तर आम्ही 27 तारखेला…

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे आयोजित हिंदू जन आक्रोश मोर्चादरम्यान एका सभेत बोलताना आमदार संग्राम जगताप यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याने आता परिसरातील वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या सभेत संग्राम जगताप यांनी, “शुरूवात वो लोग करते है लेकीन खत्म हम करते है” असा थेट इशारा…

Read More