![]()
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या तालुक्यातील कोथळी येथील १३२/३३ केव्ही उपकेंद्रात सोमवारी रात्री सुमारे ८.५५ वाजेच्या सुमारास पोटेन्शिअल ट्रान्सफॉर्मरमध्ये उष्णतेमुळे अचानक स्फोट झाला. या घटनेमुळे मुक्ताईनगर शहरासह तालुक्यात वीजपुरवठा तत्काळ खंडित झाला. सर्वत्र अंधार पसरला. घटनेनंतर उपकेंद्रातील ऑपरेटर व संबंधित अभियंत्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने स्फोटाची तीव्रता असूनही कोणत्याही कर्मचाऱ्याला इजा झाली नसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करण्यात आली. स्फोटानंतर पर्यायी व्यवस्था उभारून शहरातील वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले. काही भागांत वीजपुरवठा सुरू करण्यात यश आले; मात्र वाढत्या लोडमुळे पुन्हा पुन्हा वीजपुरवठा खंडित होत होता. यामुळे आधीच उकाड्याने त्रस्त नागरिकांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान, तालुक्यातील विविध भागांतील वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत करण्यासाठी तांत्रिक पथकाकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. लवकरात लवकर स्थिती पूर्ववत होईल, असे वीज विभागाकडून सांगण्यात आले.
Source link
कोथळी उपकेंद्रात रोहित्राचा स्फोट; मुक्ताईनगर अंधारात:रात्री 8.55 वाजेची घटना, युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू