चंद्रपुरात राजकीय राडा:एमआयएम नगरसेवक अझहर शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला, काँग्रेसच्या नेत्यावर गंभीर आरोप
चंद्रपूर महानगरपालिकेतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे एकमेव नगरसेवक अझहर शेख यांच्यावर 10 ते 15 जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून, चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यामागे काँग्रेस कार्यकर्त्यांचा आणि नेत्यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे….