चांदूर बाजार येथे विद्यार्थी, नागरिकांचा आक्रमक मोर्चा:दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध, तहसीलदारांना निवेदन
दिल्ली येथील जंतर-मंतरवर शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर २० जुलै रोजी झालेल्या लाठीचार्ज व अश्रुधुराच्या वापराच्या निषेधार्थ चांदूर बाजार येथे शांततापूर्ण मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी चौकातून दुपारी १२ वाजता निघालेल्या मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहोचून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात जंतर-मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या लोकशाही मार्गाने…