डीपीजवळ स्पार्किंगमुळे पेट्रोल पंपाशेजारी आग:मोठी दुर्घटना टळली, तिवसा येथील घटना; तीन दिवसांपासून सुरू होते स्पार्किंग
तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावरील कृष्णाजी पेट्रोल पंपालगत बुधवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. ही आग वेळीच आटोक्यात आल्याने मोठी हानी टळली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पेट्रोल पंपाशेजारील डीपीजवळ स्पार्किंग झाल्याने ही आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्षातून समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा ते मोझरी महामार्गावरील कृष्णाजी पेट्रोलियम शेजारील डीपीजवळ गेल्या अनेक दिवसांपासून स्पार्किंग होत होते. संबंधित डीपीवरील डिओ…