Headlines

फसवणूक प्रकरणातील फरार आरोपी जेरबंद:दोन वर्षांपासून होता फरार, चार जणांची केली होती फसवणूक

चंदननगर पोलिसांनी दोन वर्षांपासून फरारी असलेल्या आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला नवी मुंबईतून अटक केली आहे. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७, रा. कोल्हेवाडी, ता. कराड, जि. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तावरे याने एका तक्रारदाराकडून कुक्कटपालन व्यवसायासाठी ५० हजार रुपये उसने घेतले होते. त्यानंतर त्याने तक्रारदाराच्या पत्नीचे मंगळसूत्र एका कार्यक्रमासाठी वापरण्याच्या बहाण्याने घेतले. हे…

Read More

वरिष्ठ सभागृहात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठवणार:आमदार विवेक कोल्हे; भव्य नागरी सत्काराचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

प्रतिनिधी | कोपरगाव शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची मुख्य भूमिका आहे. विधान परिषदेच्या माध्यमातून वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रही राहणारा आणि युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून मी काम करणार आहे. तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा तुमच्या घरातील व्यक्तीच आता विधान परिषदेमध्ये गेला आहे, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले….

Read More

नीलम गोऱ्हेंना पुन्हा उमेदवारी नको!:पुणे शिवसेना महिला आघाडीचा एकनाथ शिंदेंना 'लेटर बॉम्ब'; पत्रात गंभीर आरोप

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 12 मे 2026 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागांपैकी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने शिवसेनेकडून कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शिवसेना पुणे जिल्हा महिला आघाडीने उपमुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्यास विरोध:फेरतपासणीची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे

ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, मराठा समाजाला दिलेल्या ओबीसी प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी सकल ओबीसी समाज बुधवारी रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत शासनाने नियुक्त केलेली समिती बरखास्त करण्याची मागणी केली. ओबीसींनी ओबीसींनाच मतदानाचे आवाहन आंदोलनादरम्यान करण्यात आले. मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाही देण्यात आल्या. ओबीसींच्या आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी विविध स्तरांवर बैठका, सभा सुरू…

Read More

दहावीचा पुरवणी परीक्षेचा निकाल 29.53 टक्के जाहीर:नाशिक विभाग अव्वल, मुंबई-कोकणची कामगिरी निराशाजनक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या जून-जुलै 2026 मधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) पुरवणी परीक्षेचा निकाल 29.53 टक्के लागला आहे. राज्यभरातून नोंदणी केलेल्या 52,880 विद्यार्थ्यांपैकी 51,313 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 15,157 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या परीक्षेत मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 34.06 टक्के राहिली असून मुलांची 27.75 टक्के आहे. त्यामुळे मुलींनी पुन्हा…

Read More

26 तासांत 3 हत्या करणारा सायको किलर ठार:यूपी पोलिसांनी सांगितले- आरोपीने पिस्तूल हिसकावून गोळीबार केला, एन्काउंटरमध्ये ठार झाला

यूपीमध्ये धावत्या ट्रेनमध्ये आणि रुग्णालयात तीन हत्या करणारा सायको किलर सोमवारी रात्री उशिरा पोलिसांच्या चकमकीत ठार झाला. चंदौलीचे एसपी आकाश पटेल यांनी सांगितले की, पोलीस आरोपीला गुन्हेगारी घटनास्थळाची पुनर्रचना (क्राइम सीन रिक्रिएट) करण्यासाठी घेऊन गेले होते. याच दरम्यान त्याने पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली आणि गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात…

Read More

देहू-आळंदी पालखी मार्ग 'संतभूमी' घोषित करण्याची मागणी:अभय टिळक यांची राज्य सरकारकडे मागणी, अधिवेशनात विषय मंजूर करण्याची विनंती

आळंदी देवस्थानचे माजी मुख्य विश्वस्त अभय टिळक यांनी देहू ते आळंदी या १६ किलोमीटरच्या पालखी मार्गाला ‘संतभूमी’ म्हणून घोषित करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय या परिसराला पवित्र मानतो, त्यामुळे या भूमीचे पावित्र्य जपण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी हभप राजू महाराज ढोरे, डॉ….

Read More

स्मार्ट मीटरच्या निषेधार्थ पंढरीत अर्धनग्न आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराज चौकातून महावितरणवर मोर्चा‎

राज्य शासनाने वीज ग्राहकांसाठी प्रस्तावित केलेल्या स्मार्ट मीटर योजनेच्या विरोधात पंढरपूर शहरात बुधवारी अनोखे आणि आक्रमक आंदोलन करण्यात आले. शिवक्रांती युवा संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कंदील हाती घेऊन आणि अंगावरील कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत महावितरण प्रशासनाचा निषेध केला. पंढरपूर शहरात महावितरण कडून वीज ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवले जात आहेत,…

Read More

जायकवाडीत ‘शिलवर’ मासा आढळला:15 किलो वजन, तब्बल वर्षभरानंतर आढळला दुर्मिळ मासा‎‎

जायकवाडी धरणातील गोड पाण्यात आढळणारा आणि अत्यंत दुर्मिळ मानला जाणारा ‘शिलवर’ हा गावरान मासा एका वर्षानंतर मच्छीमारांच्या जाळ्यात सापडला आहे. स्थानिक मच्छीमार सखाराम सुखदेव यांच्या जाळ्यात हा अजस्त्र मासा अडकला असून, त्याचे वजन तब्बल १५ किलो भरले आहे. हा दुर्मिळ मासा व्यापारी रवी पल्हारे यांना मिळाला असून, स्थानिक बाजारपेठेत या माशाला मागणी आहे. गोड पाण्यात…

Read More

इलेक्ट्रिक वाहनांमुळे दररोज 11 हजार लिटर डिझेलची बचत:पुणे MSRTC विभागात उपाययोजना; अरुण सिया यांची माहिती

पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाने डिझेल बचत करण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांमुळे दररोज सुमारे ११ हजार लिटर डिझेलची बचत होत असल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. पुणे विभागात सध्या १०५ इलेक्ट्रिक वाहने कार्यरत आहेत. ही वाहने दररोज ४६ हजार २३२ किलोमीटर धावतात, ज्यामुळे…

Read More