Headlines

टेबलाखालून पैसे घेणाऱ्यांची आता खैर नाही:तहसीलदारच्या कॅबिनमध्ये सीसीटीव्ही बसवा; ते कलेक्टरांच्या चेबरला जोडा, मंत्री बावनकुळेंचे आदेश

“प्रशासनाचे काम केवळ भाषणांनी नाही, तर प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे. एखादी आलिशान प्रशासकीय इमारत उभी राहिली म्हणजे प्रशासन लोकाभिमुख झाले असे होत नाही. जर नवीन इमारतीतही टेबलाखालून पैसे घेण्याचे प्रकार थांबणार नसतील, तर तहसीलदार आणि एसडीएमच्या प्रत्येक कॅबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवा आणि त्याचे थेट संचलन (सर्व्हिलन्स) जिल्हाधिकाऱ्यांच्या चेंबरशी जोडा,” अशा कडक शब्दांत महसूल मंत्री चंद्रशेखर…

Read More

15 वे विद्रोही साहित्य आणि संस्कृती संमेलन:प्रो. डॉ सोनाझरिया मिंझ करणार उद्घाटन, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची माहिती

नवी दिल्ली येथील प्रो. डॉ. सोनाझरिया मिंझ यांची सातारा येथे होणाऱ्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या उद्घाटक म्हणून निवड करण्यात आली आहे. त्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या प्राध्यापक, भारतीय शिक्षणतज्ज्ञ, गणितज्ञ आणि आदिवासी हक्कासाठी झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र आणि 15 वे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संयोजन समितीनं उद्घाटक म्हणून एकमतानं प्रो डॉ…

Read More

केज तालुक्यात 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार:जाब विचारल्याने आईला मारहाण, चार जणांविरोधात गुन्हा दाखल

इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन चिमुकलीस आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना केज तालुक्यात समोर आली आहे. या प्रकरणी पीडित बालिकेवर अत्याचार करणाऱ्या दोन तरुणांसह जाब विचारण्यास गेलेल्या तिच्या आईला बेदम मारहाण करणाऱ्या नातेवाइकांवर, अशा एकूण चार जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केज तालुक्यातील एका गावातील इयत्ता…

Read More

अधिकाऱ्याची दुचाकीवर जाऊन एमपी- महाराष्ट्र सीमेवरील वाळू घाटावर धाड:पोकलॅन्डसह दोन वाहन केली जप्त; कठोर कारवाईचे संकेत‎

वाळूतस्करांना कारवाईची कुणकुण लागू नये म्हणून धारणी येथे कार्यरत असलेले प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी सिध्दार्थ शुक्ला यांनी थेट दुचाकीवर स्वार होऊन वाळू घाट गाठला. यावेळी त्यांच्यासोबत केवळ तीन महसूल कर्मचारी होते. आयएएस शुक्ला यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवरील सोनाबर्डी गावानजीक तापी नदीत सुरू असलेल्या वाळू घाटावर गुरूवारी २४ एप्रिल रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता धाड…

Read More

Vishal Dadlani Clarifies Indian Idol Role Amidst NEET Paper Leak Controversy

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक म्युझिक कंपोजर आणि गायक विशाल ददलानी यांनी ‘इंडियन आयडॉल १६’ या रिॲलिटी शोमधून त्यांना काढून टाकल्याच्या अफवांवर मौन सोडले आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या दाव्यांना फेटाळून लावत, विशालने शोच्या सेटवरूनच एक व्हिडिओ शेअर केला आहे. खरेतर, नीट-यूजी पेपर लीक प्रकरणी सरकारवर टीका केल्यानंतर निर्मात्यांनी त्यांना परीक्षकांच्या पॅनलमधून काढून टाकले आहे अशी…

Read More

विवाहित असल्याचे माहीत असूनही संबंध ठेवले तर तो बलात्कार कसा?:ठाणे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, आरोपीची निर्दोष मुक्तता

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या एका ३० वर्षीय तरुणाची ठाणे न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली. जानेवारी २०२२ मध्ये इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रात काम करणाऱ्या एका महिलेची आणि या तरुणाची मैत्री झाली होती. एप्रिल २०२२ मध्ये लग्नाचे आश्वासन देऊन त्याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले, असा महिलेचा आरोप होता. काही काळानंतर तरुणाने आपण आधीच विवाहित…

Read More

सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जातेय:सरकारी कर्मचाऱ्यांची प्रतिक्रिया, मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा‎

. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कर्मचाऱ्यांचे भविष्य अंध:कारमय होत आहे. सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. त्यांच्या उतारवयाची सुरक्षितता हिरावली जात आहे. सरकारने आमच्या अस्तित्वाचा अंत पाहू नये. ३०-३० वर्षे सेवा केल्यानंतर जर आम्हाला म्हातारपणी पेन्शन मिळणार नसेल, तर उतारवयात कर्मचाऱ्यांना रस्त्यावर भाजी विक्रीची वेळ येईल, अशी संतप्त प्रतिक्रिया अहिल्यानगरमधील सरकारी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली….

Read More

वन विभागाच्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना अटक:सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर एसीबीची कारवाई, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

बीडमध्ये एकीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराची कोट्यवधींची ‘डील’ करण्यात मग्न होते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून बाहेर पडलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. स्वतःच्याच राहत्या घरी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लखमावार रंगेहाथ जाळ्यात सापडले. या…

Read More

जवळाबाजारच्या आठवडी बाजारात चोरीच्या शेळ्या विकण्याचा प्रयत्न:तिघे पोलिसांच्या ताब्यात; पावने चार लाखांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ शेळ्यांसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील आठवडी बाजारांमधून चोरीच्या वाढत्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रत्येक आठवडी बाजारात पोलिसांची गस्त…

Read More

प्रशासन सतर्क:चुर्मापुरीतील पुतळे कारखाना अतिक्रमण काढणार, विना परवानगी पुतळा बसवल्यास थेट जेलची हवा

मोडनिंब येथील दोन्ही महापुरुषांचे पुतळे ग्रामस्थांनी स्वखुशीने गुरुवारी सायंकाळी सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान पुतळे उभा करणारा कोठडीतील मास्टरमाइंड बाळराजे आवारे पाटील याचा चुर्मापुरी (ता.अबंड, जि.जालना) येथील पुतळा तयार करण्याच्या कारखान्याचे अतिक्रमण करुन थाटलेले पत्राशेड हटवण्याचे आदेश तेथील प्रांताधिकारी उमाकांत पारधी यांनी दिले आहेत. महापुरुषांचे पुतळे विना परवानगी रातोरात उभे करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण…

Read More