शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी:कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज
. प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले…