पंढरपूर कॉरिडॉर, उजनी पर्यटन विरोधात एल्गार:अधिकारी आणि पालक मंत्र्यांकडून उपोषणाची दखल नाही
उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, जल पर्यटन प्रकल्प व अतिरिक्त संपादित जमिनींच्या मोजणी विरोधात शेतकऱ्यांनी तीव्र भूमिका घेतली आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या बेमुदत उपोषणाचा उद्या तिसरा दिवस असून शासनाने कसलाच प्रतिसाद न दिल्याने संताप व्यक्त केला जात आहे. माढा तालुका उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्यांकडे लक्ष…