पाक गँगस्टर भट्टीच्या संपर्कात असल्याचा संशय:पुण्यामधील 66 तरुणांची एटीएसकडून कसून चौकशी
पाकिस्तानातून दहशतवादी कारवाया चालवणारा गँगस्टर शहजाद भट्टी आणि त्याच्या टोळीच्या संपर्कात असलेल्या पुणे जिल्ह्यातील ६६ जणांची राज्य दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी सखोल चौकशी केली. भट्टी हा सोशल मीडियाचा वापर करून तरुणांची माथी भडकवून देशविघातक कारवायांमध्ये ओढत असल्याची धक्कादायक माहिती मिळाल्यानंतर ही व्यापक कारवाई करण्यात आली आहे. एटीएसने मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून पुणे शहर, पुणे ग्रामीण…