अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणासाठी सिल्लोडमध्ये मातंग समाजाचा मोर्चा:लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीदिनी आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करा- सचिन साठे
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकार घेत असलेल्या अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण ‘अ ब क ड’ निर्णयाच्या समर्थनार्थ सकल मातंग समाज तसेच अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थन कृती समिती सिल्लोड तालुका यांच्या वतीने सिल्लोड तहसील कार्यालयावर गुरुवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरण करण्यासंदर्भात १ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला निर्देश दिलेले आहेत. तसेच…