Headlines

बडनेरा मतदारसंघात 47,890 मतदारांचे पत्ते गायब:नावे वगळण्याची भीती, निवडणूक आयोगासमोर मोठा पेच

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार पुनरिक्षण मोहिमेदरम्यान बडनेरा विधानसभा मतदारसंघात एक मोठा पेच निर्माण झाला आहे. या मतदारसंघात तब्बल ४७,८९० मतदारांचे पत्ते गायब झाले आहेत. आयोगाने निश्चित केलेली मुदत संपायला अवघे सात दिवस उरले असल्याने, या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली जाण्याची भीती व्यक्त होत आहे. यासंदर्भात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक…

Read More

जिल्हा परिषदेच्या 44 अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण:बदली झालेल्या शिक्षकांना जनगणना काम पूर्ण करण्याचे निर्देश

अमरावती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ४५ पैकी ४४ अतिरिक्त विषय शिक्षकांचे यशस्वीपणे समायोजन केले आहे. या शिक्षकांना बदली होऊनही देशासाठी महत्त्वाचे असलेले जनगणना कार्य पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेतील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ही समायोजन प्रक्रिया पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. या प्रक्रियेत एकूण…

Read More

आशा भोसले यांना नात जनाई भोसलेने श्रद्धांजली वाहिली:लिहिले- हे शेवटचे रहस्य जे आपण एकत्र वाटून घेत आहोत, तुम्ही अखेरचा निरोप घेण्यापूर्वी

गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांची नात जनाई भोसले हिने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. जनाईने एक फोटो शेअर करत तिच्या आजीसोबत घालवलेले ते क्षण आठवले, जे तिच्या हृदयाच्या खूप जवळ आहेत. तिने या प्रसंगाला एक ‘शेवटचे रहस्य’ म्हटले आहे, जे ती तिच्या आजीच्या निरोपापूर्वी तिच्यासोबत शेअर करत आहे. जनाई भोसलेने इंस्टाग्रामवर…

Read More

'दीपिकाने 'स्पिरिट'ची कथा लीक केली होती':निर्माता म्हणाले- 10% नफा मागितला होता, नाही म्हटल्यावर कथा लीक केली; चित्रपटातून काढले

प्रभासच्या ‘स्पिरिट’ चित्रपटातून दीपिका पदुकोण बाहेर पडण्याबाबत नवीन खुलासा झाला आहे. चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांचे बंधू प्रणय रेड्डी वांगा यांनी NTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दावा केला की, दीपिकाला चित्रपटातून काढण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, दीपिकाने मोठ्या मानधनासोबत चित्रपटाच्या नफ्यात 10 टक्के वाटा मागितला होता. जेव्हा निर्मात्यांनी तिची मागणी मान्य केली…

Read More

Rahul Roy Viral Video Reaction; Brain Stroke

54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांनी नुकत्याच एका कंटेंट क्रिएटरसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एक भावनिक पोस्ट लिहिली. अभिनेत्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांसाठी पैसे भरायचे आहेत आणि हे आजचे नाहीत, हे ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यावेळेचे, त्यापूर्वीचे आहेत. जर तुम्ही…

Read More

मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या वेळेत वाढ:विशेष कृती आराखडा तयार, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

लाखो मुंबईकरांची ‘लाईफलाईन’ असलेल्या लोकल ट्रेनमध्ये वाढत्या गुन्हेगारी आणि किरकोळ कारणांवरून होणाऱ्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, त्यांच्यात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर समस्येची दखल घेत आमदार रवींद्र फाटक यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात मुंबई शहर आणि उपनगरातील रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत लक्षवेधी सूचना मांडली. ज्यावर उत्तर देताना राज्याचे गृह…

Read More

तरुणाची १५ लाखांची फसवणूक:हडपसर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल, तपास सुरू

पुण्यात सायबर चोरट्यांनी एका तरुणाची १५ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन गुंतवणुकीत चांगल्या परताव्याचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागात राहणाऱ्या एका ३० वर्षीय तरुणाने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ फेब्रुवारी रोजी…

Read More

शेतकरी-शेतमजूर, बांधकाम मजुरांचे ‘जेलभरो’ आंदोलन‎:कामगार, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने दणाणला जिल्हाकचेरी चौक, इतर सवलती देण्याची मागणी‎

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनाचा पुढचा टप्पा थेट मुख्यमंत्र्याकडे असेल, असे यावेळी ठरविण्यात आले. त्यासाठी सर्व आमदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ…

Read More

रायगडच्या आरव्ही बीचवर थरार!:पुण्याच्या पर्यटकांची कार समुद्रात अडकली; जेसीबीने काढले बाहेर, सुदैवाने चौघेही सुखरूप

पर्यटनाचा आनंद घेताना अनेकदा पर्यटकांकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते आणि हाच अतिउत्साह कसा अंगलट येऊ शकतो, याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आला आहे. पुण्याहून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची कार चक्क समुद्राच्या लाटांमध्ये अडकून वाहून गेल्याची धक्कादायक घटना श्रीवर्धनमधील आरव्ही बीचवर घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, गाडीतील चारही पर्यटक सुखरूप बचावले…

Read More

एसटीच्या विशेष मोहिमेत आठ स्थानकावर 69 वेळा तपासणी:578 वाहनांवर कारवाई; 5 लाखांचा दंड केला वसूल‎

बसस्थानक परिसरात होणाऱ्या अवैध खासगी प्रवासी वाहतुकीला चाप लावण्यासाठी एसटी महामंडळाने राबवलेल्या मोहिमेत ४ लाख ९४ हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर परिणाम करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात अकोला शहर व ग्रामीण वाहतूक पोलिसांच्या मदतीने नागपूर विभागातील सुरक्षा व दक्षता शाखेने ५ ते १५ जूनपर्यंत मोहीम राबवली. मोहिमेत ५७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली….

Read More