‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर
जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची…