Headlines

तिसऱ्यांदा मुलाखती घेऊनही नियुक्ती आदेश रखडले:आशा स्वयंसेविका पदासाठी निवड झालेल्या महिलांचे उपोषण

अमरावती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आशा स्वयंसेविका पदासाठी तिसऱ्यांदा मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, अद्याप नियुक्ती आदेश न मिळाल्याने निवड झालेल्या तीन महिला उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या आंदोलनाचा आज (बुधवार) दुसरा दिवस होता, परंतु अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. उपोषणात…

Read More

यूपी- मिर्झापूरमध्ये रस्ते अपघात, 8 जिवंत जळाले:ट्रकच्या धडकेने बोलेरो ट्रॉलीला धडकली आणि आग लागली, मैहर देवीच्या दर्शनाहून परत येत होते

मिर्झापूरमध्ये बुधवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. बोलेरो-ट्रकच्या धडकेत 8 लोक जिवंत जळाले. इतर एका कारमधील व्यक्तीसह ट्रकचा चालक आणि क्लिनर यांचा दाबून मृत्यू झाला. जळून मरण पावलेले सर्व बोलेरोमध्ये होते. खरं तर, मध्य प्रदेशातून हरभरा घेऊन येणाऱ्या एका ट्रकचा अचानक ब्रेक फेल झाला, त्यामुळे तो अनियंत्रित झाला. ट्रकने बोलेरोला जोरदार धडक दिली. यामुळे बोलेरो…

Read More

सरकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप तिसऱ्या दिवशी:नागरिकांचे हाल, तहसील कार्यालयातील कामे ठप्प, आरोग्य सेवा विस्कळीत

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप आज तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. या आंदोलनामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालयातून मिळणारे विविध दाखले बंद झाले आहेत, तर आरोग्य सेवाही कोलमडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. दरम्यान, संपावर तोडगा काढण्यासाठी आज,…

Read More

अमरावतीत 2.40 कोटींचा धान्य घोटाळा उघड:दोन निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार, सहा दुकानदारांचे परवाने रद्द

अमरावती जिल्ह्यात रेशन दुकानदार आणि निरीक्षण अधिकाऱ्यांच्या (आयओ) संगनमताने २ कोटी ४० लाख ४८ हजार ७२ रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी बुधवारी दोन निलंबित निरीक्षण अधिकाऱ्यांविरुद्ध गाडगेनगर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले असून, दोन्ही अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे….

Read More

विधान परिषदेची रणधुमाळी:भाजपमध्ये अनेक जण इच्छुक; आयारामांना विरोध; 'वर्षा'वर फडणवीसांनी घेतली नेत्यांची बैठक

राज्यातील विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे राजकीय गणितांना वेग आला आहे. विधानसभेतील संख्याबळाच्या जोरावर होणाऱ्या या निवडणुकीत महायुतीचे वर्चस्व दिसत असले, तरी उमेदवारी कोणाला द्यायची यावरून पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज महायुतीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, तर त्यानंतर आता ‘वर्षा’ निवासस्थानी पुन्हा एकदा बैठकांचे…

Read More

राजस्थानचे मर्चंट नेव्ही अधिकारी होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकले:म्हणाले- इराणच्या सैन्याने जहाजावर गोळीबार केला, जहाजाचा व्हिडिओ पाठवला

राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातील रहिवासी असलेले मर्चंट नेव्हीचे व्हाईस कॅप्टन होर्मुझ स्ट्रेटमध्ये अडकले आहेत. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड (IRGC) ने होर्मुझ स्ट्रेटमध्ये भारताकडे येणारे जहाज थांबवून ताब्यात घेतले. इराणने आरोप केला की, जहाज परवानगीशिवाय होर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करत होते. लायबेरियाच्या ध्वजाचे एपामिनोडेस नावाचे हे कंटेनर जहाज गुजरातच्या मुंद्रा बंदरावर येत होते. सद्भावना नगरचे रहिवासी असलेले व्हाईस…

Read More

राज्यात पुढील 4 दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा:पुणे, मराठवाड्यासह विदर्भाला यलो अलर्ट, पुणे-साताऱ्यात गारांचा पाऊस

राज्यात उन्हाचा चटका असह्य होत असतानाच आता वरुणराजाने हजेरी लावत नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा वादळी वारे आणि गारपिटीचे संकट घेऊन येण्याची शक्यता आहे. राज्यातील दक्षिण विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील ४ दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असल्याची माहिती पुण्यातील हवामान शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे….

Read More

'मराठा-कुणबी' स्वतंत्र मंत्रालय स्थापन करा:मराठा आरक्षण उपसमिती बरखास्त खरा, मनोज जरांगे पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मराठा समाजाच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढण्यासाठी आणि समाजाच्या सुख-दुःखाकडे पूर्णवेळ लक्ष देण्यासाठी राज्यात स्वतंत्र ‘मराठा आणि कुणबी’ मंत्रालय स्थापन करावे, अशी आग्रही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. धाराशिव येथे भीम जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीच्या कामकाजावर तीव्र…

Read More

संभाजीनगरमध्ये प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मनपाची मोठी कारवाई:5 हजार 170 किलो प्लास्टिक जप्त, 75 हजार रुपयांचा दंड

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात मोठी कारवाई केली आहे. मध्यवर्ती भागात केलेल्या या धडक मोहिमेत ५१७० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून, संबंधित विक्रेत्यांकडून ₹७५,००० दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई झोन क्र. २ अंतर्गत अंगुरी बाग आणि जुना मोंढा परिसरातील ३ ते ४ दुकानांची तपासणी करून करण्यात आली. यामध्ये शालिमार प्लास्टिक, संजय…

Read More

ऐतिहासिक खंडोबा मंदिरात 'किरणोत्सव' अवतरला:हेरिटेज वॉकमधून उघडकीस आला दोन शतकांपूर्वीचा खगोलीय आविष्कार

छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित ‘हेरिटेज वॉक’मधून सातारा परिसरातील ऐतिहासिक खंडोबा मंदिरात एक अनोखा ‘किरणोत्सव’ उघडकीस आला आहे. दोन ते अडीच शतकांपूर्वीच्या भारतीय शिल्पकारांच्या खगोलशास्त्रीय कौशल्याचा हा एक अद्भुत पुरावा आहे. पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी स्वतः हा विलोभनीय सोहळा कॅमेऱ्यात कैद केला. ‘इंटॅक’ आणि ‘सहपीडिया’ यांच्या वतीने आयोजित या हेरिटेज वॉकमध्ये पोलीस…

Read More