संजय राऊत- मुरलीधर मोहोळ भेटीने चर्चांना उधाण:पुणे दौऱ्यात दोघांमधील भेट राजकीय चर्चेचा विषय; बैठकीआधी अनपेक्षित वळण
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत सध्या पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या या भेटीत एक वेगळीच घडामोड समोर आली आहे. पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी त्यांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीदरम्यान राऊत यांनी मोहोळ यांच्या प्रकृतीची विचारपूस करत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या….