उमरडच्या शिबिरात 800 प्रमाणपत्रांचे वाटप:महसूल विभागाच्या समाधान शिबिरामध्ये अनेक प्रलंबित दाखल्यांचा निपटारा
वाशिंबे करमाळा तालुक्यातील उमरड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित ‘समाधान शिबिर’ मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना आपली रेंगाळलेली प्रशासकीय कामे एकाच ठिकाणी पूर्ण करण्याची संधी मिळाली. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन केले. प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित या शिबिराप्रसंगी आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन वामन बदे, आदिनाथचे संचालक राजाभाऊ…