शिवरायांचा इतिहास बदलण्याचे पाप कोणी केले?:बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानावर जयंत पाटलांचा सवाल, सरकारवरही निशाणा
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर जगभरातील मराठी बांधवांचे आणि देशवासीयांचे अस्मितास्थान असल्याने त्यांच्या इतिहासावरून वारंवार सामाजिक आणि वैचारिक संघर्ष उफाळून येत असल्याचे दिसून येत आहे. इतिहासाची सोयीस्कर मांडणी करण्यावरून होणाऱ्या वादात आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी नागपुरात समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या संदर्भात केलेल्या विधानाची भर पडली असून, यावरून नवा वाद…