Headlines

Karnataka MLA Convicted in 2016 Murder Case

बंगळूरु50 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक कर्नाटकचे भाजप नेते योगेश गौडा गौदार यांच्या हत्या प्रकरणात, बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने शुक्रवारी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री विनय कुलकर्णी यांच्यासह 17 दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने सर्व दोषींवर 30-30 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. कर्नाटकच्या धारवाडमध्ये 15 जून 2016 रोजी भाजप नेते आणि जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा…

Read More

पुण्यात 11 महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू:खासगी रुग्णालयातील 4 डॉक्टरांसह 2 परिचारिकांवर गुन्हा दाखल, बालिकेवर झाले होते चुकीचे उपचार

नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात 11 महिन्यांच्या बालकाच्या मृत्यू प्रकरणी डॉक्टरांसह दोन परिचारिकांविरुद्ध सहकारनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. वैद्यकीय उपचारात निष्काळजीपणा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी डॉ. मुकुंद संगमनेरकर, डॉ. गणेश आरेकर, डॉ. श्रीधर जाधव, डॉ. राधा संगमनेरकर, तसेच परिचारिका मनीषा शिंदे आणि सारिका सुतार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हनुमंत गणपतराव गिते…

Read More

Shefali Bagga Denies Yuzvendra Chahal Dating Rumors

16 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहलसोबतच्या अफेअरच्या बातम्यांवर आता स्पोर्ट्स अँकर शेफाली बग्गाने मौन सोडले आहे. खरं तर, धनश्री वर्मापासून वेगळे झाल्यानंतर चहलचे नाव सातत्याने शेफालीसोबत जोडले जात आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये शेफालीने या अफवा पूर्णपणे फेटाळून लावल्या. ती म्हणाली की, लोक खूप लवकर कोणत्याही भेटीला चुकीचे नाव देतात. डिनर करणे म्हणजे डेटिंग…

Read More

धावत्या पीएमपी बसमध्ये महिला वाहकावर जीवघेणा हल्ला:तिकीट काढण्यावरून वाद, प्रवाशाने चालवला चाकू, प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे स्टेशन परिसरात धावत्या पीएमपी बसमध्ये एका प्रवासी तरुणाने वाहक महिलेवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी प्रवासी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरेखा बळीराम भालेराव (वय 38, रा. मुळशी, मूळ रा. मुखेड, नांदेड) असे जखमी झालेल्या वाहक महिलेचे नाव आहे. त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

जिओचा IPO मे महिन्यात येण्याची शक्यता:कंपनी लवकरच ड्राफ्ट पेपर्स दाखल करेल, हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल

रिलायन्स जिओ IPO साठी ड्राफ्ट पेपर्स मे महिन्यात दाखल करू शकते. यापूर्वी रिलायन्सचे लक्ष्य मार्च अखेरपर्यंत पेपर्स दाखल करण्याचे होते. मात्र, इराण युद्धामुळे बाजारात आलेल्या घसरणीमुळे ही टाइमलाइन पुढे ढकलण्यात आली. हा देशातील सर्वात मोठा IPO असू शकतो. मूल्यांकनात जिओ हुंडईला मागे टाकेल गुंतवणूक बँक जेफरीजने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जिओचे मूल्यांकन सुमारे 180 अब्ज डॉलर…

Read More

हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा:पुणे महापालिका निरीक्षकाला मारहाण, गाडीची काच फोडली, भाजी विक्रेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसरमधील हांडेवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी कारवाई करणाऱ्या पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत निरीक्षकाच्या गाडीची काचही फोडण्यात आली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (16 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हांडेवाडीतील भाजी विक्रेत्यांविरुद्ध कारवाई सुरू होती. त्यावेळी भाजी विक्रेत्या महिलांनी कारवाईला विरोध करत…

Read More

Kerala Sabarimala Temple Women Entry Ban LIVE Update; Supreme Court TDB

Marathi News National Kerala Sabarimala Temple Women Entry Ban LIVE Update; Supreme Court TDB | Hindu Beliefs नवी दिल्ली38 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक केरळमधील सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयात पाचव्या दिवसाची सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट राजीव धवन यांनी न्यायालयाला सांगितले की, श्रद्धा किंवा विश्वास वेळेनुसार नेहमी बदलत राहतात. हा बदल केवळ कोणताही कायदा बनल्याने…

Read More

मी बँकेत असताना माझ्यासमोर अशी प्रकरणे झाली होती:नाशिकमधील आयटी कंपनीतील प्रकारावर बोलताना अमृता फडणवीस यांचा दावा

नाशिकमधील एका आयटी कंपनीत महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, यावेळी त्यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील कारकिर्दीतील एक खळबळजनक आठवण शेअर केली आहे. “मी जेव्हा ॲक्सिस बँकेत कार्यरत होते, तेव्हा माझ्यासमोरही महिला शोषणाची अशी…

Read More

उद्धव ठाकरे विधान परिषदेवर सुषमा अंधारेंना संधी देणार?:अंबादास दानवे, विचारे, नाईक, चव्हाणांचेही नाव चर्चेत; 12 मे रोजी इलेक्शन

येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांवर कुणाला संधी द्यावी? या मुद्यावर सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जोरदार माथापच्ची सुरू आहे. त्यातच आता शिवसेना गटाकडून या जागेसाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा…

Read More

धर्मांध शक्ती सत्तेत असल्याने महाराष्ट्रात बुवाबाजीला खतपाणी:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा; दाभोलकरांची काढली आठवण

धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू…

Read More