मोहोळ- वळसंग मार्गासाठी 740 कोटी मंजूर:आमदार सुभाष देशमुखांच्या 10 वर्षांच्या पाठपुराव्याला यश, दळणवळणाला मिळणार गती
सोलापूर जिल्ह्यातील दळणवळण व पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना देणाऱ्या एनएच-४६५ अंतर्गत मोहोळ-बसवनगर (तेरा मैल)-वळसंग या ८१.३७ कि.मी. मार्गाच्या विकासासाठी ७४०.३८ कोटी रुपयांच्या निधीस केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी २०१४ पासून सातत्याने केलेल्या पाठपुराव्यावर खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शिक्कामोर्तब केले असून, त्यांच्या…