Headlines

खंडाळ्यात युवकावर जुन्या वैमनस्यातून जीवघेणा हल्ला:मारहाणीनंतर पिस्तुलातून गोळीबार, शिरवळ पोलिसांकडून चौघांना अटक

खंडाळा तालुक्यातील शिंदेवाडी येथे सोमवारी (२७ जुलै) मध्यरात्री घडलेल्या थरारक हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराबाहेर बोलावून एका २६ वर्षीय युवकावर प्रथम लाथाबुक्क्या, दगड, विटा व लाकडी पट्टीने जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यानंतर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. त्यातील एक गोळी युवकाच्या उजव्या बाजूस लागल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या…

Read More

NHM चे 525 कर्मचारी कायम होण्याचा मार्ग मोकळा:प्रदीर्घ लढ्याला यश, 10 वर्षे सेवा पूर्ण झालेल्यांची यादी शासनाकडे

अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश मिळाले असून, यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून हे कर्मचारी ‘एकच नारा…कायम करा’ या घोषणेसह आंदोलन करत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांनी तब्बल दोन महिन्यांचा संप पुकारला होता आणि जिल्हा परिषदेसमोरच ‘काळी…

Read More

ग्रामपंचायत मतदार यादीच्या हरकती, सूचनांना ब्रेक:प्रारूप प्रसिद्धी तूर्त स्थगित, एसआयआरमुळे कार्यक्रम रखडला

ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २४ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. यामुळे या यादीवरील सूचना आणि हरकतींनाही ब्रेक लागला आहे. राज्यात सध्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कामे सुरू असल्याने ही प्रक्रिया रखडली आहे. राज्य निवडणूक आयोगाने १५ जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित…

Read More

अंजनगाव सुर्जीमध्ये कृषी गोडाऊन, दारूचे दुकान फोडले:चोरटे सीसीटीव्हीत कैद, रोकडसह खत-कीटकनाशके लंपास

अंजनगाव सुर्जी शहरातील आठवडी बाजार परिसरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री रोहित ॲग्रो एजन्सीचे कृषी गोडाऊन आणि शेजारील देशी दारूचे दुकान फोडले. ही घटना आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आली. चोरी करणारे दोन अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, पोलिसांनी फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे २.४० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी लोखंडी रॉडच्या…

Read More

दिव्यांगांच्या 55 मागण्यांसाठी राज्यव्यापी अभियान सुरू:प्रत्येक जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांना पाठवणार पत्र, 9 महिने फिरणार कार्यकर्ते

दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष दिव्यांग विकास आघाडी आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यव्यापी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत थेट मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवण्यात येणार आहे. अमरावती येथून सुरू झालेले हे अभियान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये नऊ महिने चालणार आहे. अभियानाचे प्रमुख आणि दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अम्मोल…

Read More

श्रीकृष्ण मंदिरात लीळाचरित्रावर निरुपण:उद्यापासून 9 ऑगस्टपर्यंत दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा करणार प्रवचन

अमरावती येथील माताखिडकी स्थित द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिरात गुरुवार, ३० जुलैपासून लीळाचरित्र निरुपण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प. पु. श्री दिगंबर मुनी अंकुळनेरबाबा महानुभाव हे निरुपण करणार आहेत. महानुभाव वासनिक सेवा मंडळ आणि श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्री चक्रधर स्वामींच्या अगम्य लीळांवर आधारित हे निरुपण दररोज…

Read More

मेळघाटातील समस्यांवर विभागीय आयुक्तांना साकडे:पाणी, शिक्षण, सावकारी पाशासह 40 प्रश्नांवर तातडीने कारवाईचे निर्देश

मेळघाटमधील चिखलदरा आणि धारणी तालुक्यांतील नागरिकांच्या मूलभूत समस्यांसह एकूण ४० महत्त्वाच्या प्रश्नांवर एका शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. जलजीवन मिशनमधील घोटाळ्यांपासून ते शाळा, वीज, आरोग्य, खतांचा काळाबाजार आणि सावकारी पाशापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. आयुक्तांनी या सर्व मुद्द्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना व…

Read More

दीपके म्हणाले- विद्यार्थ्यांवरील पोलीस कारवाई तात्काळ थांबवा:नाहीतर मोठे आंदोलन होईल, CJP चा दोन दिवसांत दुसऱ्यांदा आंदोलनाचा इशारा

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी X वर पोस्ट करून म्हटले, ‘जर विद्यार्थ्यांविरोधातील कारवाई थांबली नाही, तर ते मोठ्या प्रमाणावर आंदोलन करतील.” यापूर्वी मंगळवारी पक्षाचे प्रवक्ते सौरव दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन पोलिसांची कारवाई न थांबल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर-मंतरवर धरणे आंदोलन केले होते. 36 दिवस चाललेल्या आंदोलनानंतर…

Read More

बेंदूरच्या दिवशीच जनावर चोरांच्या मुसक्या आवळल्या:भुईंज पोलिसांची कारवाई, पिकअपमधून जनावरे चोरणारी टोळी जेरबंद

भुईंज, कुडाळ, बावधन परिसरातील शेतकऱ्यांच्या गोठ्यांवर डल्ला मारत पिकअप वाहनातून जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा भुईंज पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. सुरेश ऊर्फ सूर्यकांत आनंदराव चव्हाण (रा. पाचवड), संदेश हणमंत पिसाळ (रा. व्याजवाडी) आणि हर्षद हिंदुराव चव्हाण (रा. कडेगाव, ता. वाई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, त्यांनी वाई तालुक्यातील विविध गावांमधून…

Read More

उबाठा नेत्याच्या सुनेचे कौटुंबिक छळाचे आरोप:विनायक राऊतांनी कोर्टात व्हॉट्सॲप चॅट्स अन् परदेश दौऱ्यांचे पुरावे केले सादर, कोर्टात काय घडले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात त्यांचीच सून गिरीजा राऊत यांनी कौटुंबिक छळ आणि जादूटोण्याच्या नावाखाली त्रास दिल्याचा गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हे हायप्रोफाइल प्रकरण आता न्यायालयात पोहोचले असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर विनायक राऊत यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील…

Read More