Headlines

शीतल तेली-उगले यांनी पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला:क्रीडा आयुक्त पदावरून बदली; अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदींनी केले स्वागत

भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी शीतल तेली-उगले यांनी आज पुणे विभागीय आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. त्या २००९ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांची राज्याच्या क्रीडा आयुक्त पदावरून पुणे विभागीय आयुक्तपदी बदली झाली होती. अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांनी नूतन विभागीय आयुक्तांचे स्वागत केले. तेली-उगले यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून कला शाखेच्या पदवी परीक्षेत सुवर्णपदक पटकावले आहे….

Read More

अभिजात मराठीचा आविष्कार सुलेखनातून व्हावा:महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण यांचे आवाहन

श्री रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड आणि अक्षर रसिक सुलेखन वर्ग, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुलेखन स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. पुणे येथील भावे स्कूलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर रामदासी वाङ्मयाच्या संशोधिका-लेखिका मनीषा बाठे यांनी कार्यक्रमाचे…

Read More

भोंदूबाबाचा 13 वर्षीय मुलीवर अत्याचार:पालघर जिल्ह्यातील संतापजनक घटना; भोंदू नराधमांना कायद्याचा धाक नाही – रोहित पवार

पालघर जिल्ह्यातील एका भोंदूबाबाने औषध देण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा आमदार रोहित पवार यांनी या घटनेवर संताप व्यक्त करत राज्यात भोंदू नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा आरोप केला आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील डहाणू…

Read More

चांदी ₹3,863 ने वाढून ₹2.25 लाख प्रति किलो:सोने ₹1,748 ने वाढून ₹1.43 लाख प्रति 10 ग्रॅम, या वर्षी ₹10 हजारने महाग झाले

सोन्या-चांदीच्या दरात आज, म्हणजेच 2 जुलै रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,748 रुपयांनी वाढून 1.43 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, 1 किलो चांदी 3,863 रुपयांनी वाढून 2.25 लाख रुपयांवर पोहोचली आहे. टीप:- सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम आणि चांदीची किंमत किलोमध्ये |…

Read More

ताडोबाच्या 'झीनत' वाघिणीने ओडिशात 4 बछड्यांना दिला जन्म:देशातील पहिला आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर प्रयोग यशस्वी

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून ओडिशातील सिमिलीपाल जंगलात स्थलांतरित केलेल्या ‘झीनत’ वाघिणीने चार बछड्यांना जन्म दिला आहे. या घटनेमुळे दोन राज्यांच्या वनविभागाद्वारे राबवलेली आंतरराज्यीय व्याघ्र स्थलांतर मोहीम यशस्वी ठरली आहे. सिमिलीपालमधील वाघांचा वंश सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांना यामुळे मोठे यश मिळाले आहे. सिमिलीपाल अभयारण्यातील वाघांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांच्यातील आनुवंशिक दोष टाळण्यासाठी ओडिशा सरकारने ताडोबातून वाघ आणण्याचा निर्णय…

Read More

पीडितेचा ब्रेनवॉश करण्याचा कट? 171 लिंक पाठवत धर्मांतराचा प्रयत्न:निदा खान प्रकरणात नवे खुलासे; नाव बदलापासून धार्मिक विधींपर्यंत

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार आणि धर्मांतराचा दबाव टाकल्याच्या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून सुरू असलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिची एसआयटीकडून कसून चौकशी सुरू असून, तपासादरम्यान अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. पीडित तरुणीचे केवळ मतपरिवर्तन करण्याचाच प्रयत्न झाला नाही, तर तिच्या घरात जाऊन धार्मिक…

Read More

अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम‎:‘सुपर’च्या कर्मचाऱ्यांनी‎वॉटर कुलर दिला भेट‎

प्रतिनिधी | अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात ( सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली. रुग्णालयातील महिला कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेत या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले. याप्रसंगी आयोजित अध्यक्षस्थानी डॉ.दिव्यांनी मुंदाने होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.माधुरी गाडेकर उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या लोककल्याणकारी कार्यास अभिवादन केले….

Read More

'एक था टायगर' लिहिणारे निलेश मिश्रा यांची मुलाखत:'कूद' च्या माध्यमातून मी अभिनयाच्या किंडरगार्टनमध्ये आलो, प्रसिद्धी हेच अंतिम ध्येय नाही

पत्रकार, कथाकार, गीतकार आणि आता अभिनेता म्हणून नवीन इनिंग सुरू केलेले नीलेश मिश्रा सध्या ‘कूद’ या चित्रपटाबद्दल चर्चेत आहेत. हा चित्रपट त्यांच्या यू-ट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला आहे. यावर त्यांनी मनमोकळी बातचीत केली… अभिनय नेहमीच तुमच्या स्वप्नांचा भाग होता का? खरं सांगायचं तर, मी स्वतःला कधीच अभिनेता म्हणून पाहिलं नव्हतं. कॉलेजच्या दिवसांत एक नाटक लिहिलं होतं….

Read More

महिलांनी अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची गरज- कुलकर्णी:फुलंब्रीत विद्यार्थी सुरक्षा अन् ‘पोक्सो’ कायद्याबाबत जनजागृती शिबिर उत्साहात‎

महिला आणि मुलींना कायद्याचे पूर्ण संरक्षण लाभलेले आहे. गरज आहे ती फक्त अन्यायाविरुद्ध पुढे येण्याचे धाडस दाखवण्याची, असे प्रतिपादन फुलंब्रीच्या दिवाणी न्यायाधीश आर. एस. कुलकर्णी यांनी केले. येथील न्यू ओएसिस इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये तालुका विधी सेवा समितीच्या वतीने विद्यार्थी सुरक्षा व पोक्सो कायदा या विषयावर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी त्या…

Read More

क्रेडिट कार्डच्या थकीत बिलावरून एजंटची व्यक्तीला मारहाण:पुण्यात भररस्त्यात घडली घटना; रिकव्हरी एजंट की गुंड? कारवाईची मागणी

क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्यावरून एका खासगी बँकेच्या एजंटकडून एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेवर सर्वसामान्य लोकांकडून तीव्र संताप व्यक्त होत असून, रिकव्हरी एजंटवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. या घटनेमुळे बँकेचे रिकव्हरी एजंट आहेत की गुंड? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. देशात गत काही वर्षांत…

Read More