Headlines

तीनचा जनता दरबार 5:45 वाजता; वैजापूर पंचायत समितीत घोषणाबाजी:गोंधळ वाढताच कलेक्टर बीडीओंच्या केबिनमध्ये दाखल

पंचायत समितीत बुधवारी आयोजित जनता दरबार नागरिकांसाठी ‘प्रतीक्षेचा दरबार’ ठरला. दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ मिन्नू पी.एम. आणि तहसीलदार सुनील सावंत यांच्या उपस्थितीत जनता दरबार होणार असल्याने नागरिक दुपारी २ वाजेपासूनच पंचायत समितीत जमा झाले होते. मात्र अधिकारी वेळेवर आले तरी त्यांनी जनता दरबाराऐवजी बंद दाराआड आढावा बैठक सुरू केली. तब्बल अडीच…

Read More

भाजप नेते प्रसाद लाड मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या भेटीला:मात्र, भेटीआधी धमकीचा फोन, दोन जण पोलिसांच्या ताब्यात

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापले असताना भाजप नेते प्रसाद लाड आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित भेटीपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा गोंधळ उडाला. प्रसाद लाड आज अंतरवली सराटीत जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मात्र त्याआधीच त्यांना धमकीचा फोन आल्याची माहिती समोर आली असून, ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या…

Read More

डेव्हिड धवनवर संतापले वासू भगनानी:म्हणाले- कुली नंबर 1 मुळे ₹27 कोटींचे नुकसान झाले; नंतर वरुणने विचारपूसही केली नाही

निर्माता वासू भगनानी यांनी शुक्रवारी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटातील ‘चुनरी चुनरी’ गाण्याच्या वापरावरून नाराजी व्यक्त केली. हा चित्रपट डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शित केला आहे आणि रमेश तौरानी यांच्या टिप्स बॅनरने याची निर्मिती केली आहे. एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत भगनानी म्हणाले की, त्यांनी डेव्हिड धवन यांच्याशी ‘बीवी नंबर 1’ या चित्रपटाचा रिमेक…

Read More

परराज्यातील अवैध मद्याची महाराष्ट्रात तस्करी:1 कोटी 86 लाखांचा मुद्देमाल जप्त; मुंबई व सातारा भरारी पथकाची कारवाई

गोवा राज्यातील विक्रीसाठी आणलेला विदेशी मद्याचा प्रचंड साठा चोरट्या मार्गाने महाराष्ट्रात आणणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक (महाराष्ट्र राज्य, मुंबई) आणि भरारी पथक (सातारा) यांनी सातारा-लोणंद रोडवर संयुक्त सापळा रचून तब्बल १ कोटी ८६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक…

Read More

सर्वोच्च न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना 2 दिवस वर्क फ्रॉम होम:न्यायाधीश कार पूलिंग करून न्यायालयात जातील; मोदींच्या इंधन वाचवण्याच्या आवाहनावर निर्णय

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने कामकाजासंदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. आता न्यायालयाच्या प्रत्येक विभागातील कर्मचारी दोन दिवस वर्क फ्रॉम होमवर असतील. सर्व न्यायाधीश कार पूल करतील. रजिस्ट्रीशी संबंधित 50 टक्के कर्मचारी देखील घरून काम करतील. सोमवार, शुक्रवार आणि मिसलेनियस डे (जे दिवस आधीपासून निश्चित नसतात) रोजी सूचीबद्ध प्रकरणांची सुनावणी केवळ…

Read More

दिगाव येथे पतीच्या निधनाचा धक्का असह्य:4 तासांत पत्नीनेही सोडले प्राण, पती हरी सुसुंद्रे यांचे दीर्घ आजाराने तर पत्नी भागाबाई यांचे ह्रदयविकाराने निधन‎‎

. सुख-दुःखात सोबत राहू आणि मृत्यूच्या दारातही साथ निभावू, या उक्तीची प्रचिती देणारी हृदयद्रावक घटना कन्नड तालुक्यातील दिगाव येथे घडली आहे. सुसुंद्रे कुटुंबातील वृद्ध पती-पत्नीचा अवघ्या चार तासांच्या अंतराने मृत्यू झाला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दिगाव येथील रहिवासी हरी सांडू सुसुंद्रे (८०) यांचे गुरुवारी (९ जुलै) रात्री १० वाजेच्या सुमारास दीर्घ…

Read More

शाळा 15 ऐवजी 30 जूनपासून सुरू:विदर्भातील उष्णतामान, न्यायालयीन निर्देशामुळे शिक्षण विभागाचा निर्णय

अमरावती जिल्ह्यातील सीबीएसई आणि राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आता १५ जूनऐवजी ३० जूनपासून सुरू होतील. विदर्भातील सध्याचे उष्णतामान, विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी आणि शाळा व्यवस्थापनांना याबाबतचे निर्देश जारी केले…

Read More

धक्कादायक!:कळमनुरी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे यांची कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या

कळमनुरी तालुका मराठी पत्रकार संघाचे शहराध्यक्ष सौरभ साकळे (२७) यांनी त्यांच्या कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी ता. २७ घडली आहे. त्यांच्यावर सायंकाळी कळमनुरी येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कळमनुरी येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्या सौरभ यांनी मागील सात वर्षात शहरासह तालुक्यातील प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. बातम्यांच्या माध्यमातून त्यांनी जनतेचे प्रश्‍न…

Read More

पहिल्याच पावसात अर्धवट उघड्या गटारांमुळे रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य:पावसाळापूर्व कामांची गुणवत्ता चव्हाट्यावर, आरोग्य धोक्यात

शहरात शुक्रवारी मान्सूनच्या पहिल्याच मोठ्या पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे ४ ते ५ तास चाललेल्या या संततधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी महापालिकेच्या पावसाळापूर्व कामांची पुरती पोलखोल झाली आहे. पहिल्याच पावसाने शहराची दैना उडवली असून प्रशासनाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पावसाचा जोर वाढताच शहरातील अनेक भागांतील गटारांची अर्धवट उघडी…

Read More

हिंदू धर्म नाही, लिंगायत बांधवांनी जनगणनेत केवळ 'लिंगायत' नोंदवा:बसवनंद स्वामीजींचे विधान, काळाराम मंदिराच्या पुजाऱ्यांचा आक्षेप

आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर लिंगायत धर्माच्या स्वतंत्र ओळखीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. “हिंदू हा धर्म नसून भारतात त्याला अधिकृत मान्यता नाही, त्यामुळे जनगणनेमध्ये धर्माच्या रकान्यात लिंगायत बांधवांनी केवळ ‘लिंगायत’ असेच नमूद करावे,” असे खळबळजनक आवाहन बंगळूर धर्मपीठाचे मठाधिपती जनबसवनंद स्वामीजी यांनी केले आहे. मात्र, त्यांच्या या भूमीकेला नाशिकच्या श्रीकाळाराम मंदिराचे पुजारी सुधीरदास महंत यांनी…

Read More