Headlines

नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि…

Read More

शेतकऱ्यांसाठी नवे ॲप:खत खरेदी घरबसल्या, आयएफएमएस-ॲग्रीस्टॅक प्रणालीचे एकत्रीकरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खत खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ‘फर्टीलायझर सेल ॲप्लिकेशन सिस्टीम’ (FSAS) नावाचे नवीन मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपमुळे शेतकऱ्यांना आता घरबसल्या खतांचे बुकिंग करता येणार आहे, ज्यामुळे त्यांची गैरसोय टळणार आहे. राष्ट्रीय खत विक्री आराखडा प्रकल्पांतर्गत, आयएफएमएस (IFMS) आणि ॲग्रीस्टॅक (AgriStack) या प्रणालींचे एकत्रीकरण करून हे ॲप तयार करण्यात आले आहे….

Read More

PM नरेंद्र मोदींच्या डुप्लिकेटला ईशाने खरे मोदी समजले:पाहताच धक्का बसला आणि म्हणाली- ओह मोदीजी, नंतर फोटो काढले

अभिनेत्री आणि बिग बॉस फेम ईशा मालवीयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडिओमध्ये ती एका क्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीला पीएम मोदी समजली. त्यानंतर तिथे उपस्थित पापाराझी आणि इतर लोक हसू लागले. खरं तर, ईशा ब्राइट एंटरटेनमेंट अवॉर्ड्स २०२६ च्या रेड कार्पेटवर पोहोचली होती. याच दरम्यान तिची भेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डुप्लिकेटशी…

Read More

Nashik Simhastha Plan Misses Outer Ring Road; Traffic Woes Ahead for Kumbh Mela 2027

आगामी 2027 च्या कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय नियोजनाचे चक्र फिरू लागले असले तरी, वाहतुकीचा प्रश्न आ वासून उभा आहे. 2015 च्या सिंहस्थानंतर नाशिकच्या रस्त्यांवर 9 लाख 28 हजार नवीन वाहनांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, ज्या रस्त्यांवरून हा वाहतुकीचा भार वाहिल . आरटीओने दिलेल्या आकडेवारी ही शहरातील कोंडीवर शिक्कामोर्तब करणारी आहे. 2015-16 मध्ये नाशिकमध्ये 7 लाख 32…

Read More

बेगडी माणसांच्या आहारी न जाता भगवंताची कास धरा:भागवत कथेत राजेशकृष्ण महाराजांचे प्रतिपादन‎

तथाकथित सत्संग व आध्यात्मिकतेच्या माध्यमातून केलेली काही कर्मे ही अंधश्रद्धेला कारणीभूत होतात. याचे फलित काहीच होत नाही. अंधश्रद्धा ही काही केल्या जात नाही. त्यामुळे बेगडी माणसांच्या आहारी न जाता सरळ भगवंताची कास धरा; कारण भगवंतामुळे तुम्हाला खरा मार्ग मिळेल व त्यांचा अनुग्रह आपणावर खऱ्या अर्थाने होऊ शकेल, असे वृंदावन निवासी आंतरराष्ट्रीय भागवत कथाकार राजेशकृष्ण महाराज…

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

NEET परिक्षेच्या पार्श्वभुमीवर रेल्वे गाड्यांना सर्वसाधारण डब्बे जोडण्याचा निर्णय:विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार

राज्यात नीट परिक्षा तसेच प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वेगाड्यांना एक अतिरिक्त सर्वसाधारण डब्बा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसह प्रवाशांची सोय होणार आहे. राज्यात रविवारी ता. २१ नीट परिक्षा होणार आहे. यापरिक्षेसाठी आपापल्या परिक्षा केंद्रावर जाण्यासाठी शहरी तसेच ग्रामीण विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागणार आहे. काही ठिकाणी स्थानिक परिक्षा…

Read More

शबरीमाला व्यवस्थापनाने म्हटले- अयप्पा मंदिर रेस्टॉरंट नाही:देव ब्रह्मचारी, महिला का येऊ इच्छिता?; एससीने म्हटले- कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेला चुकीचे ठरवणे कठीण

केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भातील खटल्याची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी घेतली. मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या त्रावणकोर देवस्वम बोर्डाने (टीडीबी) म्हटले आहे की, हे खेळण्यांच्या दुकानाचे किंवा रेस्टॉरंटचे प्रकरण नाही. हे एका अशा देवतेला समर्पित मंदिर आहे, ज्यांना जन्मभर ब्रह्मचारी मानले जाते. टीडीबीचे प्रतिनिधित्व करणारे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले, “१० ते ५० वयोगटातील महिला या देवतेच्या…

Read More

अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या:बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी…

Read More

पुणे महापालिका 'अ‍ॅक्शन मोड'वर!:महसूल वाढीसह विकासकामांना गती देण्याचे महापौर मंजुषा नागपुरे यांचे निर्देश

महापौर मंजुषा नागपुरे यांनी महानगरपालिकेच्या आढावा बैठकीत महसूल वाढीसाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचे आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश दिले. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला, ज्यात शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रशासकीय आढावा बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त (ई) आणि संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित…

Read More