Headlines

15 बँकांना सोने-चांदीच्या आयातीचा नवीन परवाना मिळाला:SBI, PNB आणि HDFC यादीत समाविष्ट, देशात पुरवठ्याची कमतरता भासणार नाही

केंद्र सरकारने देशातील 15 प्रमुख बँकांना 31 मार्च 2029 पर्यंत सोने आणि चांदीची आयात करण्याची परवानगी दिली आहे. या यादीत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB) आणि HDFC बँक यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. ही मंजुरी 1 एप्रिल 2026 पासून लागू झाली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना…

Read More

आजी-माजी महापौरांमध्ये शाब्दिक चकमक:किशोरी पेडणेकर थेट दालनात गेल्या, रितू तावडेंनी तात्काळ फोन केला; दोघी फोनवरच भिडल्या

चेंबूरमध्ये स्कूल व्हॅनवर झाड पडून 10 वर्षीय विद्यार्थ्याचा झालेला मृत्यू आणि साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये पडून अस्लम शेख यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू, या दोन धक्कादायक घटनांमुळे मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनांनंतर विरोधकांनी पालिकेवर जोरदार टीकास्त्र सोडले असून, उपमहापौर संजय घाडी यांनी या बेजबाबदारपणासाठी थेट पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना…

Read More

6000mAh Battery, 50MP Camera, ₹29,999 Price

नवी दिल्ली1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी नथिंगने भारतात आपली नवीन ‘b’ सीरीजचा पहिला पारदर्शक स्मार्टफोन नथिंग फोन (4b) लॉन्च केला आहे. हा फोन त्याच्या अनोख्या डिझाइन, नथिंगच्या सिग्नेचर ग्लिफ इंटरफेस, 6000mAh बॅटरी आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 6 जेन 4 प्रोसेसरसह आला आहे. फोनमध्ये अनेक प्रगत AI फीचर्स देखील देण्यात आले आहेत. नथिंग फोन (4b) दोन…

Read More

सोलापुरात थरार!:रुग्णाला रुग्णालयात सोडताच रुग्णवाहिकेला भीषण आग, श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरातील घटना

सोलापूरमधील श्री मार्कंडेय रुग्णालय परिसरात बुधवारी दुपारी सव्वादोनच्या सुमारास एका रुग्णवाहिकेला अचानक भीषण आग लागल्याची थरारक घटना घडली. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच हा प्रकार घडला. सुदैवाने, रुग्णाला आधीच सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आणि संभाव्य जीवितहानी टळली. MH-13 AC-0659 या क्रमांकाची रुग्णवाहिका एका गंभीर रुग्णाला घेऊन सोलापूरच्या…

Read More

मंत्री नीतेश राणे म्हणजे करमणुकीचे साधन:सत्ताधारी NCP च्या आमदाराचा घणाघात; बकरी ईदच्या कुर्बाणीवरून साधला निशाणा

मंत्री नीतेश राणे हे केवळ करमणुकीचे साधन असल्याची टीका सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवडी यांनी केली आहे. मंत्री नीतेश राणे यांना यांना सध्या कुणीही सीरियस घेत नाही. त्यांच्याकडे केवळ करमणुकीचे साधन म्हणून पाहिले जाते, असे ते म्हणालेत. त्यांच्या या टीकेमुळे सत्ताधारी महायुतीतील घटकपक्षांत वादाची ठिणकी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नीतेश राणे यांनी…

Read More

निदाच्या अटकेसाठी पोलिसांनी वर्दी, शासकीय वाहन टाळले:न्यायाधीशांच्या घरून घेतला ट्रांझिट रिमांड, नाशिकला जाताना बदलली गाडी

नाशिक येथील टीसीएस कंपनीतील बहुचर्चित लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान हिला अखेर गुरुवारी (७ मे) छत्रपती संभाजीनगरातील नारेगावातून अटक करण्यात आली आहे. २ मे रोजी नाशिक न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी तिच्या मुसक्या आवळल्या. गुरुवारी (७ मे) रात्री ८ वाजेच्या…

Read More

Jeff Bezos: AI Speed Could Slow Due to Water Scarcity

पॅरिस14 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे मत आहे की, AI नोकऱ्या संपवण्याऐवजी नवीन रोजगार निर्माण करेल. ते म्हणाले की, हे तंत्रज्ञान नवनिर्मितीचा वेग वाढवेल, ज्यामुळे भविष्यात बेरोजगारीऐवजी कामगारांची कमतरता (लेबर शॉर्टेज) निर्माण होऊ शकते. याव्यतिरिक्त, त्यांनी असेही म्हटले की, पाण्याच्या कमतरतेमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वेग थांबू शकतो. पॅरिसमध्ये आयोजित ‘विवाटेक 2026’ परिषदेत जेफ…

Read More

नकार, प्रेम आणि संघर्ष:अंशुमन-महवशने सांगितली हृदयस्पर्शी कथा; लहान शहरातून आलेल्या दोघांनी व्यक्त केले- यशामागचे दुःख आणि अधुरे प्रेम

अंशुमन पुष्कर आणि महवश लवकरच ‘सतरंगी बदला का खेल’ या वेब सिरीजमध्ये दिसणार आहेत. लहान शहरांमधून बाहेर पडून आपल्या मेहनतीने आणि प्रतिभेने ओळख निर्माण करणाऱ्या या दोन्ही कलाकारांनी दिव्य मराठीशी खास संवाद साधला. मुलाखतीत त्यांनी आपला संघर्ष, नकार, प्रेम, लहान शहरांमधील विचार आणि अभिनयाच्या प्रवासावर मनमोकळेपणाने चर्चा केली. अंशुमनने सांगितले की काही पात्रे त्याला आतून…

Read More

सिल्लोडमध्ये सेवानिवृत्त शासकीय‎अधिकाऱ्यांचा सेवागौरव सोहळा‎:कार्यक्रमात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाला अधिकाऱ्यांचा सत्कार

प्रतिनिधी |सिल्लोड सिल्लोड–सोयगाव तालुक्यात प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून प्रदीर्घ काळ जनतेची सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा सेवापूर्ती व सेवा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात रविवारी पार पडला. सिल्लोड येथील स्वस्तिक लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अब्दुल सत्तार होते. यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पोलीस उपाधीक्षक शेषराव उदार, जलसंपदा विभागाचे उपअभियंता राजधर दांडगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे…

Read More

धावत्या कारने अचानक घेतला पेट, चौघांनी मृत्यूला दिला चकवा:10 सेकंदात होत्याचं नव्हतं; वाढत्या उष्णतेचा कहर? हादरवणारी घटना

राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटना सातत्याने समोर येत असताना उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला. शहाड पूर्व परिसरातील रिलायन्स डिजिटलसमोर धावत्या टोयोटा क्रिस्टा कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कारमध्ये चार प्रवासी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि सर्वांनी वेळीच गाडीतून बाहेर पडल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या…

Read More