Headlines

बंगालमध्ये आज मुख्यमंत्र्यांची घोषणा होऊ शकते:शहा निरीक्षक बनले, दुपारी भाजप आमदार दलाची बैठक; 9 मे रोजी शपथविधी

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर 4 दिवसांनी शुक्रवारी नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू होईल. भाजपने गृहमंत्री अमित शहा यांना केंद्रीय निरीक्षक आणि ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना सह-निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. दोन्ही नेते दुपारी 2 वाजता भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा केली जाऊ शकते. नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा…

Read More

अर्जुन कपूरच्या बहिणीचे प्री-वेडिंग फंक्शन सुरू:अंशुला कपूरच्या मेहंदी समारंभात सोनम, जान्हवी आणि वरुणसह अनेक स्टार्स पोहोचले

चित्रपट निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आणि अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूर आज म्हणजेच 6 जुलै रोजी लग्न करत आहे. ती तिचा दीर्घकाळचा प्रियकर रोहन ठक्करसोबत लग्न करणार आहे. लग्नापूर्वी तिच्या घरी प्री-वेडिंग विधी सुरू झाले आहेत. माता की चौकीनंतर अंशुलाची मेहंदी सेरेमनी आयोजित करण्यात आली होती, ज्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत….

Read More

नाशिकमध्ये आंतरजातीय विवाहानंतर विवाहितेचा छळ:8 वेळा गर्भपात घडवला, पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रेमविवाह करून सुखी संसाराचे स्वप्न पाहणाऱ्या एका विवाहितेचा जात वेगळी असल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी अमानुष छळ केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये उघडकीस आली आहे. तू आमच्या जातीची नाहीस, असे टोमणे मारत विवाहितेची इच्छा नसताना तिचा तब्बल 8 वेळा गर्भपात घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी नाशिकच्या म्हसरूळ पोलिस ठाण्यात पतीसह सासू-सासऱ्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

देशात 'एक देश, एक पक्ष अन् निवडणूकच नाही' अशी परिस्थिती:राज्यात कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी त्याला भाजपच्या सावलीतच राहावे लागणार- विजय वडेट्टीवार

महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वतःचा विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, कोणताही पक्ष कितीही मोठा झाला, तरी अखेर त्यांना भाजपच्या पंखाखाली आणि त्यांच्याच सावलीत राहावे लागणार आहे. भाजप त्यांना हवा तेवढा सूर्यप्रकाश कधीच मिळू देणार नाही, असा टोला काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेची भाजपला भीती वाटते, या चर्चेत काहीही…

Read More

अशोक खरात प्रकरणात 4 मंत्र्यांचा थेट सहभाग:माहिती मिळाल्यावर खरातला मारून टाकतील, कॉंग्रेस नेते नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी राज्यातील चार मंत्र्यांचा या प्रकरणात थेट सहभाग असल्याचा खळबळजनक दावा करत प्रकरणाला नवे वळण दिले आहे. अंधश्रद्धेच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी खरातला आधीच अटक करण्यात आली असून, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या प्रकरणातील काही आक्षेपार्ह व्हिडिओ समोर…

Read More

दिव्य मराठी इम्पॅक्ट:अखेर पातोंडा गावातील शुद्ध पाणीपुरवठा झाला सुरळीत

अकोट तालुक्यातील पातोंडा गावातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘दैनिक दिव्य मराठी’च्या ग्राउंड रिपोर्टनंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. सलग ४० ते ४५ दिवस नळ कोरडे, दूषित पाणी, महिलांची फरपट आणि ग्रामस्थांचे हाल या गंभीर वास्तवावर प्रकाशित झालेल्या बातमीचा परिणाम दिसून आला आहे. अखेर गावात शुद्ध नळ पाणीपुरवठा सुरळीत सुरू करण्यात आला आहे….

Read More

100 स्टार्टअप्सना दरमहा 25 हजार रुपयांचे सीड फंडिंग:विद्यापीठ-अमृत संस्थेचा करार; नवउद्योजकांना मिळणार आर्थिक व तांत्रिक बळ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या रिसर्च अँड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला आहे. या करारानुसार, विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड केली जाईल, ज्यापैकी सुरुवातीला २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ मिळेल. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप किंवा सीड…

Read More

मृदा परीक्षण अन् सेंद्रिय शेती काळाची गरज:शिंगणापुरात घुमला आधुनिक शेतीचा संदेश, कृषीदिंडीचे नागरिकांकडून ठिकठिकाणी स्वागत, कृषी दिन उत्साहात साजरा

कृषी दिनानिमित्त ‘रावे’ कार्यक्रमांतर्गत शनैश्वर माध्यमिक विद्यालय शनिशिंगणापूर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, शेतकऱ्यांचे योगदान आणि शाश्वत कृषी पद्धतींबाबत जागरूकता निर्माण केली. का . यावेळी विद्यार्थ्यांनी कृषीदिंडीचे आयोजन करून कृषीविषयक घोषवाक्ये, माहितीपर फलक, शेतकरी संवाद तसेच विविध कृषी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली. या उपक्रमात कृषीकन्या भूमिका घुगे,…

Read More

सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली:अमेरिका-इराण युद्ध थांबल्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून शिपमेंट सुरू, यामुळे उद्योगांना दिलासा

देशात लिक्विफाइड नॅचरल गॅस म्हणजेच LNG चा पुरवठा आता सामान्य झाला आहे. केंद्र सरकारने अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धादरम्यान देशात लागू केलेल्या ‘इमर्जन्सी नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर’चे आदेश मागे घेतले आहेत. LNG चा वापर उद्योगांमध्ये जास्त होतो, त्यामुळे या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळेल. हा निर्णय पश्चिम आशियामध्ये युद्धविराम झाल्यामुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधून लिक्विफाइड नॅचरल…

Read More

अधिकारी होण्याचे स्वप्न भंगले!:चित्तेपिंपळगावात भीषण अपघातात 18 वर्षीय तरुणी ठार, वडील गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील चित्तेपिंपळगाव येथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने 18 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे वडील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मृत तरुणीचे ‘मोठी अधिकारी’ होण्याचे स्वप्न या अपघातामुळे कायमचे अधुरे राहिले असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More