Chandrakant Patil Slams NEET Protest At Jantar Mantar
नीट पेपरफुटी प्रकरणावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनावर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “नीट पेपरफुटीचा विषय आता संपला असून जंतर-मंतरवर सुरू असलेले आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून केवळ राजकारणासाठी आहे,” असा आरोप . पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “नीटची परीक्षा पेपरफुटीनंतर पुन्हा घेण्यात आली. त्यामध्ये कोणतीही गडबड झाली नाही. निकाल लागले आहेत…