रावगावामध्ये ढोल-ताशांचा गजर निवृत्तीनाथांच्या पालखीचे स्वागत:300 किमी पायी प्रवास केला पूर्ण; उंट, जेसीबीद्वारे पुष्पवृष्टी
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथून २० दिवसांमध्ये सुमारे ३०० किलोमीटरचा पायी प्रवास करत संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू संतश्रेष्ठ श्री संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी शनिवारी एक लाखांहून अधिक वारकऱ्यांसह सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली. जिल्ह्याच्या सीमेवरील करमाळा तालुक्यातील रावगाव येथे पालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश होताच रांगोळीच्या पायघड्या, ढोल-ताशांचा…