राज्यात महामार्गांवर अग्नितांडव:समृद्धीवर धावत्या कारने घेतला पेट, तर दौंडमध्ये टेम्पो भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही
राज्यातील दोन प्रमुख महामार्गांवर वाहनांना अचानक भीषण आग लागल्याच्या घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर एका धावत्या कारने अचानक पेट घेतला, तर दुसरीकडे दौंडजवळ पुणे-सोलापूर महामार्गावर एका उभ्या मालवाहू टेम्पोला आग लागली. सुदैवाने, या दोन्ही थरारक घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून, प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले आहेत. मात्र, दोन्ही वाहने जळून खाक झाली…