नांदेड हादरले:2 दोन चिमुरड्यांसह शिक्षकाची गोदावरी नदीत कार झोकून आत्महत्या, मानसिक छळाला कंटाळून शिक्षकाचे टोकाचे पाऊल
नांदेड जिल्ह्याला हादरवून टाकणारी अत्यंत दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आपल्या सारा आणि सुशील या दोन लहान मुलांना कारमध्ये बसवून भरधाव कार आमदुरा येथील गोदावरी नदीवरील पुलावरून नदीत झोकून दिल्याची घटना घडली. या भीषण दुर्घटनेत सुनील मोरे व त्यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाला असून संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे….