Headlines

दुरवस्था:भिंगारच्या स्मशानभूमीत सुविधांचा अभाव, दुःखाच्या प्रसंगातही होताहेत हाल, सुविधांसाठी आंदाेलनाचा इशारा‎

भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या मूलभूत सुविधेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना दुःखाच्या प्रसंगातही प्रचंड मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे अंत्यविधी करणे म्हणजे मृताच्या नातेवाईकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. ही स्मशानभूमी भिंगार पंचक्रोशीसह नागरदेवळे उपनगरातील नागरिकांसाठी अंतिम संस्काराचे प्रमुख…

Read More

पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली, 6 जणांचा मृत्यू:15 जखमी, मुलांचाही समावेश; 40 जण होते स्वार; आनंदपूर साहिबवरून परत येत होते

फतेहगड साहिब येथे भाविकांनी भरलेली बस उलटली. यात 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 15 जण जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमध्ये 40 भाविक होते. ही घटना रात्री उशिरा घडली. भाविक आनंदपूर साहिब येथील बैसाखी मेळ्यातून परत येत होते. यादरम्यान, बस्सी पठाणा येथील मैण माजरी गावाजवळ…

Read More

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा का घेत नाही?:सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा; मोदी सरकारवर सडकून टीका

“नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. विद्यार्थी आत्महत्या करत आहेत, पण सरकारला इतर पक्ष फोडण्यातून वेळ मिळत नाही. जंतरमंतरवर सोनम वांगचुक आणि युवक करत असलेल्या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे,” अशी स्पष्ट भूमिका उद्धव ठाकरे यांनी आज मांडली. ‘मातोश्री’वर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार, शिक्षणमंत्री…

Read More

'अरे मोदीजींच्या चमच्या, देश काय तुमच्या बापाची जहागीर आहे का?':रोहिणी खडसेंचा अतुल भातखळकरांवर जोरदार पलटवार; महाराष्ट्रात राजकारण तापले

राजधानी दिल्लीत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद महाराष्ट्रातही पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी संघटनांनी तसेच विरोधी पक्षांनी दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवत ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन केले. तर दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडून कॉकरोच जनता पार्टीवर तसेच या आंदोलकांवर टीका केली जात आहे. पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतायत, बापाचा माल आहे का? अशा शब्दांत भाजप नेते…

Read More

महाराष्ट्रात राबवणार 'सिंगापूर मॉडेल':रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या शाखा 50 ठिकाणी होणार – मंत्री मंगल प्रभात लोढा

सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर राज्यात रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाने आगामी वर्षापर्यंत ५० ठिकाणी शाखा सुरू कराव्यात. तसेच या विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के नोकरीची हमी मिळेल अशा स्वरूपाची विद्यार्थ्यांची तयारी सिंगापूरच्या कौशल्य विद्यापीठाच्या धर्तीवर तयार करून घ्यावी असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली. एल्फिस्टन तांत्रिक विद्यालयाच्या मध्यवर्ती रतन टाटा महाराष्ट्र…

Read More

कोल्हापूर जिल्ह्यात तिघांचा वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात बुडून मृत्यू:24 तासांनंतर मृतदेह शोधण्यात यश, राधानगरी व करवीर तालुक्यात शोककळा

कोल्हापूर जिल्ह्यातून एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी पाण्यात बुडून तिघा जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. घटना घडल्यापासून कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी नदी आणि कॅनॉल पात्रात युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली होती. अखेर २४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह शोधण्यात जवानांना यश…

Read More

पुण्यात 6 बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना अटक:बुधवार पेठेत पोलिसांची मोठी कारवाई, तपास सुरू

पुणे शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांविरोधात पुणे पोलिसांनी अत्यंत धडक मोहीम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार रविवारी रात्री संपूर्ण पुणे शहरात राबवण्यात आलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’ दरम्यान ६ बेकायदेशीर बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवार पेठेतील ‘सागर बिल्डिंग’वर छापा टाकून ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त ऋषिकेश…

Read More

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याला ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स 2026’ पुरस्कार:पक्षी संवर्धनातील उल्लेखनीय कार्याची दखल; पर्यावरण दिनी झाले वितरण‎

निसर्ग संवर्धन, पक्ष्यांच्या अधिवासाचे पुनरुज्जीवन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संपूर्ण टीमला प्रतिष्ठेचा ‘स्पीसिज अँड हॅबिटॅट्स वॉरियर्स २०२६’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. जागतिक . गेल्या वर्षभरात अभयारण्य प्रशासनाने पक्ष्यांच्या अधिवास निर्मिती व पुनरुज्जीवनासाठी विविध उपक्रम राबविले. या प्रयत्नांमुळे देश-विदेशातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, पर्यटकांचा ओघ वाढून पर्यटनाला…

Read More

खडकवासलातून विसर्ग वाढताच महापौर ॲक्शन मोडमध्ये:पहाटेच सिंहगड रस्त्यावरील पूरबाधित भागांची पाहणी, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी आज पहाटे सिंहगड रस्त्यावरील एकता नगर आणि विठ्ठल नगर या संभाव्य पूरबाधित परिसरांची पाहणी केली. संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी ही भेट दिली. या पाहणीदरम्यान महापौरांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याचे…

Read More

नागपूर जिल्हा परिषदेच्या 'प्रोजेक्ट ड्रिम'ची देशपातळीवर दखल:ज्ञानरथाच्या माध्यमातून शैक्षणिक जागरूकतेचा अनोखा संदेश

नागपूर जिल्हा परिषदेच्या ‘प्रोजेक्ट ड्रिम’ उपक्रमाची दखल भारतीय टपाल विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी वाढवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. टपाल विभाग आणि जिल्हा परिषद नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमावर आधारित एका विशेष वाहतूक कव्हरचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. या ऐतिहासिक उपक्रमाची सुरुवात नागपूरच्या शंकर नगर टपाल…

Read More