Headlines

अजित पवारांच्या मृत्यूशी अशोक खरातचा संबंध!:मृत्यूच्या 6 दिवस आधी खरातने बदलले 4 मोबाईल, अंजली दमानियांचा दावा

अजित पवार यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात अशोक खरात याची सविस्तर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या मृत्यूच्या अवघे 6 दिवस आधी अशोक खरातने तब्बल 4 मोबाईल फोन बदलल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयास्पद हालचालींमुळे अजित पवार यांच्या मृत्यूचा थेट संबंध खरातशी असल्याची दाट…

Read More

शिंदे सेनेत जाऊनही भालकेंची राजकीय कोंडी कायम:सात नगरसेवकांनी सोडली साथ, भाजपकडून अडवणूक सुरूच, पंढरपुरात नाट्यमय घडामोडी‎

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत बुस्टर डोस मिळालेल्या भालके गटाच्या अडचणी कमी होताना दिसेनात. एका बाजूला नगरपालिकेच्या विकास कामांसाठी सत्ताधारी पक्षात प्रवेश केलेला असताना दुसऱ्या बाजूला सहकारी नगरसेवक फोडण्याचे काम पडद्याआडून भाजप करीत आहे. त्याचबरोबर . पंढरपूर तालुक्याच्या राजकीय पटलावर माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा पांडुरंग परिवार आणि दिवंगत आमदार भारत भालके यांचा भालके गट सर्वात प्रभावशाली…

Read More

"आयक्यू'सोबत "ईक्यू' अन् "एसक्यू' वाढवा तरच घडेल परिपूर्ण पिढी:"भारत टॅलेंट सर्च' परीक्षेतील 31 गुणवंतांचा सत्कार

आजच्या स्पर्धेच्या युगात आपण मुलांना पुस्तकी ज्ञान देत आहोत. पालक आणि शिक्षकांना आता मुलांच्या संगोपनाची पद्धत बदलावी लागेल. १९८० च्या दशकात वर्गात पहिला नंबर मिळवणे किंवा ‘आयक्यू’ (बुद्ध्यांक) असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते. पण आजच्या काळात हुशार असणे पुरेसे नाही. जोपर्यंत मुलांमध्ये ‘ईक्यू’ (भावनिक बुद्ध्यांक) आणि ‘एसक्यू’ (आध्यात्मिक बुद्ध्यांक) विकसित होत नाही, तोपर्यंत परिपूर्ण पिढी…

Read More

नोराने अश्लील गाण्याबद्दल मागितली माफी:महिला आयोगाला म्हणाली- आता असे आयटम साँग करणार नाही; अश्लीलता पसरवण्याचा हेतू नव्हता

‘KD द डेविल’ या चित्रपटातील ‘सरके चुनर’ गाण्यात अश्लीलता पसरवल्याच्या प्रकरणी गुरुवारी बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही राष्ट्रीय महिला आयोगासमोर (NCW) हजर झाली. नोराने आयोगाला लेखी माफीनामा सादर केला आणि स्पष्ट केले की, तिचा हेतू कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. नोराने महिला आयोगाला सांगितले की, यापुढे ती अशा प्रकारचे आयटम साँग करणार नाही, ज्यामुळे महिलांच्या सन्मानाला धक्का…

Read More

न्यायालयात "क्लीन चिट', खासदार नीलेश लंकेंचा शनिचरणी "अभिषेक':राजकीय तसेच न्यायालयीन अशा दोन्ही आघाड्यांवर विजय

प्रतिनिधी |सोनई राजकीय मैदानात गाजलेल्या विजयानंतर आता न्यायालयीन लढाईतही यश मिळाल्यानंतर खासदार नीलेश लंके यांनी शनिवारी रात्री शनिशिंगणापूर गाठले. शनी महाराजांच्या मूर्तीवर तैलाभिषेक करत त्यांनी ‘न्यायदेवते’च्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. . लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर माजी खासदार सुजय विखे यांनी संभाजीनगर हायकोर्टात याचिका दाखल करून लंके यांच्या निवडीला आव्हान दिले होते. मात्र बुधवारी न्यायालयाने ही…

Read More

एकनाथ शिंदे सरकारच्या निर्णयावर देवेंद्र फडणवीस सरकारचा ब्रेक:14 तलाव संवर्धन प्रकल्प रद्द; निधीची वसुली करण्याचेही आदेश

राज्यातील तलाव संवर्धन प्रकल्पांबाबत सरकारने मोठा निर्णय घेत 14 प्रकल्पांची प्रशासकीय मान्यता रद्द केली आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने हा आदेश जारी केला असून या विभागाची जबाबदारी मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे, हे प्रकल्प मागील सरकारच्या कार्यकाळात मंजूर झाले होते. यामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या 11 प्रकल्पांचा समावेश आहे, तर…

Read More

चेन्नईमध्ये प्रवाशाने धावत्या विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला:विमान धावपट्टीवरून टर्मिनलकडे जात होते, पायलटने तात्काळ थांबवले; आरोपीला अटक

चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी सकाळी लँडिंगदरम्यान एअर अरेबियाच्या धावत्या विमानात एका प्रवाशाने आपत्कालीन दरवाजा उघडला. हे विमान शारजाहहून चेन्नईला पोहोचले होते आणि त्यात 231 प्रवासी होते. ही घटना सकाळी सुमारे 3:23 वाजता घडली. एअरबस A320 मॉडेलचे G9 471 क्रमांकाचे विमान धावपट्टीवरून टर्मिनलकडे जात होते. घटनेनंतर वैमानिकाने तात्काळ विमान थांबवले आणि विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर…

Read More

अभिनेते झीशान अय्युब यांना 'भाई वैद्य युवानेता' पुरस्कार:22 जून रोजी 98 व्या जयंतीनिमित्त पुण्यात होणार प्रदान

थोर समाजवादी लोकनेते भाई वैद्य यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त यंदाचा ‘लोकनेते भाई वैद्य युवा नेता राष्ट्रीय पुरस्कार २०२६’ प्रसिद्ध चित्रपट अभिनेते झीशान अय्युब यांना जाहीर करण्यात आला आहे. भाई वैद्य फौंडेशन आणि आरोग्य सेनेच्या वतीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दिला जातो. फौंडेशनच्या चिटणीस प्रा. डॉ. गीतांजली वैद्य आणि आरोग्य सेनेचे केंद्रीय समिती सदस्य डॉ. नितीन केतकर…

Read More

पेट्रोल-डिझेलवरील शुल्क कपातीमुळे सरकारला ₹1-लाख कोटींचे नुकसान:अर्थमंत्री म्हणाल्या- देशाच्या वाढीवर नकारात्मक वातावरण निर्माण करणे चुकीचे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी (२५ मे) सांगितले की, पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याने सरकारला ₹१ लाख कोटींच्या महसुलाचे नुकसान होईल. यासोबतच त्यांनी भारताच्या आर्थिक वाढीबद्दल निर्माण होत असलेले निराशाजनक वातावरण फेटाळून लावले आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा बचाव केला. अर्थमंत्र्यांनी हे मुंबईत स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) च्या ३७ व्या स्थापना…

Read More

नाल्यात पाच महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळला:अमरावतीत खळबळ, गाडगेनगर पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू

अमरावती येथील लक्ष्मीनगर परिसरात आज, बुधवारी सकाळी पावसाच्या पुराच्या पाण्यात पाच महिन्यांच्या बालकाचा मृतदेह वाहून आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य…

Read More