मुंबई मनपाच्या महासभेत महापौर-विरोधक आमनेसामने:ट्रोलिंग, धमक्या, पावसाळी दुर्घटना आणि प्रशासनाच्या कारभारावर जोरदार खडाजंगी
मुंबई महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मरिन ड्राईव्हवरील व्हायरल व्हिडिओवरून झालेल्या ट्रोलिंगला सभागृहातून सडेतोड उत्तर दिले, तर दुसरीकडे माजी महापौर तथा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर, पावसाळ्यातील दुर्घटनांवर आणि वाढत्या कंत्राटांवरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत आक्रमक भूमिका घेतली. ‘मी रीलस्टार की…