Headlines

अमरावतीत प्रेयसीला व्यसनाची माहिती दिल्याने तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या:माहिती देणाऱ्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांत गुन्हा दाखल

तरुणाचे व्यसन आणि घरातील कौटुंबिक वादाची माहिती प्रेयसीला देऊन लग्न मोडण्यास कारणीभूत ठरलेल्या नातेवाईक दांपत्याविरुद्ध कुऱ्हा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने धक्का सहन न होऊन एका 27 वर्षीय तरुणाने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

चॉकलेटमधून दिली गुंगीची गोळी:अमरावतीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर ओळखीच्या तरुणाकडून अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

ओळखीचा गैरफायदा घेऊन एका 25 वर्षीय तरुणाने 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुंगीचे चॉकलेट देऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. याप्रकारामुळे शहरात मोठी खळबळ उडाल्या असून, राजापेठ पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून नराधम तरुणाविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शंतनू (वय 25, रा. अमरावती) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नराधम तरुणाचे…

Read More

ऑस्ट्रेलियात हनिमून साजरा करणार नवविवाहित आमिर खान-गौरी स्प्रॅट:मुलगा आझाद आणि क्विनही सोबत जातील, परत आल्यावर नवीन घरात शिफ्ट होतील

बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान यांनी 5 जुलै रोजी गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटशी लग्न केले आहे. लग्नानंतर आता हे जोडपे हनिमूनसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. ही एक वर्क ट्रिप देखील असणार आहे, ज्यात आमिरचा मुलगा आझाद आणि गौरीचा मुलगा क्विन देखील सोबत असतील. डेक्कन क्रॉनिकलच्या रिपोर्टनुसार, आमिर खान आणि गौरी स्प्रॅट आपापल्या मुलांसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होत…

Read More

पुणे ग्रामीण पोलिसांची कारवाई:4 गावठी पिस्तूल, 6 काडतुसे जप्त; 3 आरोपींना अटक, 1.19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पुणे ग्रामीण पोलिसांनी अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात मोठी कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चार गावठी पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख १९ हजार ५०० रुपये आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक (कोल्हापूर परिक्षेत्र) रंजनकुमार शर्मा आणि…

Read More

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत:राज्यात भाजपची सूत्रे बावनकुळेंकडे जातील, संजय राऊतांची राजकीय भविष्यवाणी

“भारतीय जनता पार्टीची वाटचाल देशातील लोकशाही मोडीत काढण्याच्या दिशेने सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याप्रमाणे भारतातही ‘राष्ट्राध्यक्ष पद्धत’ लागू करण्याच्या हालचाली केंद्रात सुरू आहेत,” असा अत्यंत गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी केंद्रातील भाजप सरकार, २०२९ च्या निवडणुका आणि महाराष्ट्रातील नेतृत्वाबाबत अनेक…

Read More

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव वर्मा

ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान करणाऱ्या संस्था न राहता नवोपक्रम, बौद्धिक संपदा, स्टार्टअप्स आणि समाजपरिवर्तन घडविणाऱ्या केंद्रांमध्ये विकसित व्हावे, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागांतर्गत…

Read More

हिंगोलीत हायवेवर थरार:कारवाडी उड्डाणपुलाजवळ दुचाकीस्वाराला लाथ मारून पाडले; मारहाण करत 25 हजारांचा मुद्देमाल लुटला, तिघांवर गुन्हा दाखल

हिंगोली तालुक्यातील कारवाडी शिवातील उड्डाणपुला जवळ दुचाकीवर आलेल्या तिघांनी एका दुचाकीस्वारास मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवारी ता. 10 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आता त्या तीन चोरट्यांचा शोध सुरु केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील पिंपरखेड येथील अविनाश वाढवे हे हिंगोली येथे दुचाकी दुरुस्तीचे काम…

Read More

18 गावांतील मालमत्ताधारकांना 7/12 ऐवजी पीआर कार्ड मिळणार:शासनाच्या अध्यादेशाची छत्रपती संभाजीनगर मनपा करणार अंमलबजावणी

शहरातील वाढीव हद्दीतील आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) नसलेल्या मालमत्ताधारकांचे लवकरच सर्वेक्षण होणार आहे. त्यांना मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी 7/12 उताऱ्यांवर अवलंबून राहावे लागत होते, त्या उताऱ्यांची जागा आता अधिकृत ‘प्रॉपर्टी कार्ड’ घेणार आहे. महाराष्ट्र शासनाने 26 मे 2026 रोजी जारी केलेल्या अध्यादेशानुसार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार भूमी अभिलेख विभागामार्फत ही प्रक्रिया केली…

Read More

संघर्षाचा पहिला मोठा विजय:कर्जमाफीच्या दोन जाचक अटी हटल्या, शेतकऱ्यांचा लढा अद्याप सुरूच राहणार – रविकांत तुपकर

कर्जमाफीच्या निकषांमधील दोन महत्त्वाच्या जाचक अटी हटवण्याचा निर्णय हा शेतकरी आंदोलनाचा पहिला मोठा विजय असल्याचा दावा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका घेतली असून, बैठक संपताच विधानसभेत त्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याचे तुपकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा…

Read More

तेलंगणा- बलात्काराच्या आरोपीने पीडित आणि कुटुंबाची केली हत्या:आपल्या पत्नीला आणि मुलांनाही मारले; जामिनावर बाहेर येताच 6 खून केले

तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात शुक्रवार रात्री जामिनावर बाहेर आलेल्या एका आरोपीने 6 खून केले. आरोपी राजकुमारने आधी घरी त्याच्या 30 वर्षीय पत्नीची, 4 वर्षांच्या मुलाची आणि 18 महिन्यांच्या मुलाची हत्या केली. यानंतर तो सुमारे 6 किलोमीटर दूर एका गावात पोहोचला. जिथे त्याने 17 वर्षांच्या मुलीची, तिच्या आईची आणि आजीचीही हत्या केली. याच मुलीने 16 मे रोजी…

Read More