Headlines

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी पुनर्परीक्षा 14 मे रोजी:विद्यार्थ्यांच्या तक्रारीनंतर प्राधिकारिणीने घेतला निर्णय

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील काही अभ्यासक्रमांच्या पुनर्परीक्षा १४ मे रोजी होणार आहेत. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींनंतर विद्यापीठाच्या प्राधिकारिणीने हा निर्णय घेतला आहे. परीक्षा व मूल्यमापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या परीक्षा गुरुवारी, १४ मे रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांना तक्रारी होत्या, ज्याची दखल घेऊन विद्यापीठाने पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला….

Read More

चीफ पोस्टमास्तर जनरल होत येळीच्या सुपुत्राने रचला इतिहास:या पदावर विराजमान होणारे जिल्ह्यातील पहिले अधिकारी, जि. प. शाळा ते आयआयटी असा प्रवास‎

ग्रामीण भागात गुणवत्ता ठासून भरलेली असते, फक्त गरज असते ती जिद्दीची आणि कष्टाची. हेच पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील येळी गावचे सुपुत्र रामचंद्र किसन जायभाये यांनी. भारतीय डाक सेवेतील (IPoS) १९९९ बॅचचे वरि . रामचंद्र जायभाये हे यापूर्वी नवी दिल्ली येथील पोस्टल संचालनालयात जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत होते. त्यांनी देशभरात…

Read More

केदारनाथ पायी मार्गावर डोंगरावरून कोसळले दगड:घोड्याच्या चालकाचा मृत्यू, राजस्थानचा प्रवासी गंभीर जखमी

केदारनाथ पायी मार्गावर शुक्रवारी दुपारी मोठा अपघात झाला. चीरबासा हेलिपॅडजवळ डोंगरावरून अचानक दगड कोसळल्याने एका घोडेवाल्याचा मृत्यू झाला, तर राजस्थानचा एक प्रवासी गंभीर जखमी झाला. हा अपघात दुपारी सुमारे 3 वाजता गौरीकुंडपासून सुमारे तीन किलोमीटर पुढे चीरबासा हेलिपॅडजवळ झाला. डोंगरावरून अचानक दगड कोसळू लागले, ज्याच्या तडाख्यात घोडेवाला आणि एक प्रवासी सापडले, असे सांगण्यात आले. माहिती…

Read More

Pune Hosts Parambh 2026 for International Tax System Reforms

आयकर विभागाने पुण्यात ‘प्रारंभ २०२६’ अंतर्गत एक विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय करप्रणाली आणि ट्रान्सफर प्रायसिंगमधील बदलांवर सखोल चर्चा करण्यात आली, ज्याचा उद्देश विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देणे आणि करप्रणाल . पुणे येथील ‘बोधी टॉवर’ आयकर कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला. मुख्य आयकर आयुक्त (आंतरराष्ट्रीय करप्रणाली व ट्रान्सफर प्रायसिंग) मोहित जैन यांच्या…

Read More

लासूर स्टेशन परिसरात पूर्वमशागतीला वेग:शेतकऱ्यांकडून बांधबंदिस्ती सुरू, ट्रॅक्टरने नांगरणी सुरू, बैलजोडीने नांगरणीचे चित्र दुर्मिळ‎

गंगापूर तालुक्यातील लासूर स्टेशन, शिल्लेगाव, माळीवाडगावसह ग्रामीण भागातील शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीला लागले असून शेतशिवारात मशागत करण्याची घाई मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे. तालुक्यात सर्वत्र ट्रॅक्टरने नांगरणी सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. रब्बी हंगामातील पिके घेऊन आता शेतकरी खरीप पेरणीकडे लक्ष केंद्रित करताना दिसत आहेत. परिसरात बैलजोडीकडून नांगरणीचे चित्र दुर्मिळ झाल्याचे दिसून आले. शेतीमधील…

Read More

एल निनोवर मात करत शेतीचे नियोजन करा:नन्हेगाव येथील बैठकीतून अधिकाऱ्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎

आगामी खरीप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर नन्हेगाव (ता. अक्कलकोट) येथील ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांसाठी विशेष ‘खेत बचाव अभियान २०२६’ कार्यक्रमात मार्गदर्शनपर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत संभाव्य ‘एल निनो’च्या प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि खरीप पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या…

Read More

लुधियानात नशेत धुंद युवक-युवतीचा व्हिडिओ:उभे राहू शकत नव्हते, बस स्टँडवर रस्त्याच्या मधोमध डोलत राहिले; तरुणी चेहरा लपवताना दिसली

लुधियानामध्ये नशेत धुंद असलेल्या एका मुला-मुलीचा व्हिडिओ समोर आला आहे. बस स्टँडजवळ दोघे इतके नशेत होते की त्यांना चालताही येत नव्हते. युवक आपले डोके खाली घालून उभा होता आणि युवती नशेत डोलत होती. यावेळी मुलगी आपला चेहरा लपवताना दिसली. हा व्हिडिओ रविवार (12 एप्रिल) चा असल्याचे सांगितले जात आहे. 6 दिवसांपूर्वीही बस स्टँडजवळचा एक व्हिडिओ…

Read More

वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी‎

वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून…

Read More

आज गंगापूरला सहा, सोयगावला दोन मिरवणुका:पैठणला आकर्षक देखावा, ढोल-ताशे, झांज पथके वेधणार लक्ष, दिवसभर उपक्रमांची रेलचेल‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्ह्यात जल्लोषमय वातावरण आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणुका निघणार असून विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमही राबवले जाणार आहेत. यात अभिवादन, रक्तदान शिबिर, पुस्तक वाटपाचा समावेश आहे. . पैठणमध्ये मुख्य मिरवणूक ४ तास सुरू राहणार आहे. यंदा डीजेमुक्त मिरवणूक असणार आहे, असे पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी सांगितले. यंदाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

Read More