Headlines

पद्म विभूषण पंडवानी गायिका तीजन बाई यांचे निधन:आजोबांकडून महाभारत ऐकवण्याची प्रेरणा मिळाली, 13 व्या वर्षी रंगमंच प्रवेश

छत्तीसगडच्या लोककला आणि पंडवानी गायनाला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या पद्मविभूषण डॉ. तीजन बाई यांचे आज निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. त्यांनी शनिवारी मध्यरात्री 3.15 वाजता रायपूर एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या गत काही महिन्यांपासून आजारी होत्या. तीजन बाई यांनी आपल्या सशक्त आवाजाने, प्रभावी अभिनयाने आणि अनोख्या सादरीकरण शैलीने पंडवानीला केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही…

Read More

अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात, ईडीनेही केला हायकोर्टात अर्ज:नाशिकहून आणून सायंकाळी पोलिस ठाण्यात दाखल; चौकशीला वेग

शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक, खासगी सावकारकी आणि आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांमध्ये अडकलेला भोंदू अशोक खरात अखेर शिर्डी पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नाशिक येथील विशेष तपास पथकाच्या ताब्यात असलेल्या खरातला शिर्डी पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले असून स . दरम्यान, खरातच्या आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याने अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सक्रिय झाले आहे. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला…

Read More

नियम मोडल्यास कारवाई:राज्यात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहनांना नो एन्ट्री, 5 ते 15 जूनदरम्यान राज्यव्यापी मोहीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला भगदाड पाडणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध खासगी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विशेष अंमलबजावणी मोहीम’ राबवण्याचे आदेश परिवहनमंत्री तथा एसटी…

Read More

उद्या भव्य मोर्चा:व्यावसायिक दुबैया हत्येप्रकरणी श्रीरामपूर सलग दुसऱ्या दिवशी 'कडकडीत' बंद

शनिवारी भरदुपारी झालेले हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसरात बेमुदत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या गुन्हेगारीविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, मंगळवारी बाजारपेठेसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. या हत्येचा तीव्र…

Read More

मनोज जरांगेंचा पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा:8 महीने उलटूनही सातारा गॅझेटचा जीआर न निघाल्याने संताप, मुख्यमंत्र्यांवरही टीका

मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. मुंबईच्या आंदोलनावेळी मराठा आरक्षणाचा सातारा गॅझेटचा जीआर एका महिन्यात काढतो असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावर आठ महीने जाले तरी काहीही कारवाई करण्यात आली नाही. मराठा आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेतले गेले नाहीत, अशा शब्दात जरांगे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. मनोज…

Read More

अंतरवालीतील आश्वासनाची पूर्तता, मृत आंदोलकांच्या वारसांना नोकरीचा मार्ग मोकळा:विखे पाटलांची माहिती; आणखी सकारात्मक निर्णयांची ग्वाही

मराठा आरक्षणाच्या आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या आंदोलकांच्या वारसदारांना औद्यगिक विकास महामंडळा मध्ये नोकरी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने घेतला आहे.अंतरवाली सराटी येथील आंदोलना दरम्यान दिलेल्या आश्वासनाची कार्यवाही या निर्णयातून झाली असल्याचे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मराठा आरक्षण आणि वेगवेगळ्या मागण्यासाठी मनोज जरांगे…

Read More

विधान परिषद निवडणूक:झिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला; मविआत पेच कायम

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र,…

Read More

अमेझॉनने एआय ऑडिओ फीचर लॉन्च केले:अमेझॉनवर प्रश्न विचारून खरेदी करता येईल; पुनरावलोकन-उत्पादन तपशीलानुसार उत्तर देईल

अमेझॉनने एक नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्यामध्ये युझर प्रोडक्टबद्दल प्रश्न विचारून संवाद साधू शकतात. कंपनीने आपल्या ‘Hear the Highlights’ फीचरमध्ये ‘Join the Chat’ हा नवीन पर्याय जोडला आहे. याच्या मदतीने युझर एखाद्या प्रोडक्टची ऑडिओ समरी ऐकताना टेक्स्ट किंवा आवाजात प्रश्न विचारू शकतात. उदाहरणार्थ, युझर विचारू शकतो की, ही कॉफी मशीन मुलांसाठी योग्य आहे का?…

Read More

Maharashtra Leaders Pay Tribute To Ajit Pawar On Birth Anniversary

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे नेते अजित पवार यांची आज पहिली जयंती आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी आजही कायम आहे. आज दादांच्या पहिल्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवा . नेत्यांनी दादांसोबतच्या आठवणींना दिला उजाळा अजितदादांचा कडक स्वभाव, सकाळी ६ वाजता सुरू होणारी त्यांची कार्यशैली आणि शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ओळख…

Read More

नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी शनिवारी रात्री पुण्याच्या नवले पुलावर जनआक्रोशाचा उद्रेक झाला. संतप्त ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महामार्ग रोखून धरल्याने सुमारे चार तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले आणि रस्ता मोकळा केला. मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही…

Read More