रायगड विकास प्राधिकरण बरखास्तीची मागणी, संवर्धनात भ्रष्टाचार:9 वर्षांत 603 कोटी मंजूर; तरीही गडावर निकृष्ट कामे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या संवर्धन आणि विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गेल्या नऊ वर्षांत सुमारे ६०३ कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊनही गडावर समाधानकारक काम झालेले नाही. शिवरायांच्या सैन्यातील पायदळप्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज लौकिक गोळे आणि ॲड. अर्चना मारणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती…