पालखी मार्गावर वृक्षांचा 7 वा वाढदिवस:सेंद्रिय खताचा केक कापून दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश
वृक्षांचे वाढदिवस साजरा करणे काळाची गरज आहे. वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. यासाठी झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढ्यातून वारी परिवाराने सुरू केलेली संकल्पना महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी व्यक्त केले. वारी परिवार व विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्या वतीने शिवाजी महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा-पंढरपूर हरित…