वर्ध्यात चिमुरडीवर अत्याचार होतोय अन् मंत्री खुर्ची मागण्यात मग्न:कामासाठी मुख्यमंत्र्यांकडे नाही तर काय मग सरन्यायाधीशांकडे जायचे?- विजय वडेट्टीवार
राज्यातील जनतेसमोर पिण्याचे पाण्याची मोठी समस्या उभी राहणार आहे. वर्ध्यात 12 वर्षांच्या मुलीची हत्या करण्यात आली तिच्यावर अत्यचार झाल्याचे समोर आले, अशा घटना रोज घडत आहेत. राज्यात कायदा सुवव्यस्था राहिलेली नाही. पण आपण आरोप-प्रत्यारोप आणि सत्तेवर चर्चा करत आहोत. काही मंत्री देवाच्या दर्शनाला जातात आणि फडणवीस दिल्लीत गेले तर आमच्या वहिनींना महाराष्ट्राचे नेतृत्व मिळू दे…